Reliance AGM मध्ये 5G सर्व्हिसची घोषणा, जाणून घ्या किती असेल इंटरनेट स्पीड?

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या 44 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कंपनीने 5G सर्व्हिसची घोषणा केली आहे. सोबत सर्वात स्वस्त 5 जी फोन सादर केला आहे.

Reliance AGM मध्ये 5G सर्व्हिसची घोषणा, जाणून घ्या किती असेल इंटरनेट स्पीड?
Follow us
| Updated on: Jun 24, 2021 | 4:35 PM

मुंबई : देशातील सर्वात मोठ्या कंपनीचे बिरुद मिरवणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या ( Reliance Industries Limited- RIL) 44 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (RIL AGM 2021) गुरुवारी मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी अनेक महत्वपूर्ण घोषणा केल्या. यावेळी त्यांनी रिलायन्स कंपनी आगामी काळात उर्जा क्षेत्रात मोठी गुंतवणूक करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे आता डिजिटल क्षेत्रापाठोपाठ उर्जा क्षेत्रातही रिलायन्स कंपनी सुपरपॉवर होण्याच्या दिशेने पहिले पाऊस पडले आहे. दरम्यान, कंपनीने यावेळी 5G सर्व्हिसची घोषणा केली आहे. सोबत सर्वात स्वस्त 5 जी फोन सादर केला आहे. (Reliance AGM 2021 : Jio Announces 5G service in India with 1 GBPS speed, know more)

रिलायन्सच्या AGM (वार्षिक सर्वसाधारण सभा) बैठकीत मुकेश अंबानी यांनी भारताला 2G मुक्त करणार असल्याचे सांगितले. 5G इकोसिस्टम विकसित करण्यासाठी बाजारपेठेत 5G ला सपोर्ट करणारी उपकरणे आली पाहिजेत. त्यासाठी रिलायन्स आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत मिळून काम करत आहे. रिलायन्स जिओमुळे भारताला केवळ 5G तंत्रज्ञानच मिळणार नाही, तर देश 2G मुक्त होणार असल्याचा दावा मुकेश अंबानी यांनी केला आहे.

1Gbps टॉप स्पीड

जिओ इतर कंपन्यांच्या सहकार्याने 5 जी डिव्हाइस बनवत आहे. यात हेल्थकेयर आणि किरकोळ वस्तूंचादेखील समावेश असेल. जिओने जगातील अन्य कंपन्यांना 5G साधने निर्यात करण्याचीही घोषणा केली आहे. दरम्यान, कंपनीने सांगितलं आहे की, Jio 5G सोल्यूशनची टॉप स्पीड 1 जीबीपीएस (1Gbps) पर्यंत गेली आहे.

रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी म्हणाले, “आम्ही जागतिक भागीदारांसह 5 जी इकोसिस्टम विकसित करण्यासाठी आणि 5 जी उपकरणांची श्रेणी विकसित करण्यावर काम करत आहोत. भारताला केवळ 2 जी मुक्त करणे हे एकमेव लक्ष्य नाही, तर देशाला 5G सक्षम करण्याकरिता प्रयत्न केले जात आहेत.

JIO Phone Next सादर

रिलायन्स AGM 2021 च्या 44 व्या बैठकीत मुकेश अंबानी यांनी Jio फोन सादर केला आहे. या फोनचे नाव जिओ फोन नेक्स्ट (JIO Phone Next) असे आहे. मुकेश अंबानी यावेळी म्हणाले की, “ग्रामीण भागांना 2-जीपासून मुक्त करण्यासाठी अल्ट्रा किफायतशीर फोनची आवश्यकता आहे. मागील वर्षी मी गुगलच्या सुंदर पिचाई यांच्याशी या विषयावर बोललो. त्यानंतर कंपनीने यासंदर्भात पावलं उचलली. जिओच्या 5 जी फोनचे नाव जिओ फोन नेक्स्ट (JIO Phone Next) असे असेल.”

अंबानी यांनी सांगितले की, हा नवा 5 जी फोन Google आणि Jio अॅप्सना सपोर्ट करेल. गुगल आणि रिलायन्सने संयुक्तपणे बनवलेल्या जिओ फोन नेक्स्टमध्ये अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम वापरली जाईल. या स्मार्टफोनमध्ये व्हॉईस असिस्टंट, ऑटोमॅटिक रीड-अलाउड ऑफ स्क्रीन टेक्स्ट, लँग्वेज ट्रान्सलेशन, ऑग्युमेंटेड रिअॅलिटी फिल्टर्ससह स्मार्ट कॅमेरा आणि अन्य फीचर्स मिळतील.

Reliance Jio आणि Google कडून स्वस्त 5G स्मार्टफोनची घोषणा यापूर्वीच केली होती. सध्याच्या घडीला पोको M3 प्रो 5 जी हा भारतामधील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन आहे. त्याची किंमत 13999 रुपये इतकी आहे. JIO Phone Next ची किंमत याहून कमी असेल, असे बोलले जात आहे. परंतु कंपनीने अद्याप या फोनच्या किंमतीचा खुलासा केलेला नाही. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर 10 सप्टेंबरला हा फोन बाजारपेठेत दाखल होईल.

Jio Phone ची किंमत किती?

Jio Phone Next या स्मार्टफोनची किंमती किती असेल, याबाबत रिलायन्सकडून खुलासा करण्यात आलेला नाही. मात्र, जाणकारांच्या अंदाजानुसार या स्मार्टफोनची किंमत साधारण 4000 रुपयांच्या आसपास असेल. जिओ-गुगलाच हा अँड्रॉईड स्मार्टफोन गेमचेंजर ठरण्याची शक्यता आहे.

रिलायन्स जिओ हे सध्याच्या घडीला डेटा कन्झम्प्शनच्या बाबतीतल जगातील दुसऱ्या क्रमांकाचे नेटवर्क आहे. रिलायन्स जिओच्या माध्यमातून दर महिन्याला 630 कोटी जीबी डेटा वापरला जातो. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण 45 टक्क्यांनी वाढल्याचे मुकेश अंबानी यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Reliance AGM 2021: मुकेश अंबानींची मोठी घोषणा; रिलायन्स जिओ भारताला 2G मुक्त करणार

मोठी बातमी: Reliance JIO कडून मुंबई आणि पुण्यात 5G नेटवर्कच्या टेस्टिंगला सुरुवात

(Reliance AGM 2021 : Jio Announces 5G service in India with 1 GBPS speed, know more)

Non Stop LIVE Update
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे.
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट.