भारतात सोनी कंपनीचे स्मार्टफोन बंद होणार

भारतात सोनी कंपनीचे स्मार्टफोन बंद होणार

टोकियो (जपान) :  भारतात ‘सोनी’ SONY या प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे स्मार्टफोन लवकरच बंद होणार आहे. मंगळवारी (21 मे) जपानमधील टोकियोमध्ये आयोजित कॉर्पोरेट स्ट्रेटजिक एका बैठकीदरम्यान सोनी कंपनीने याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे.

टोक्योमध्ये झालेल्या बैठकीदरम्यान, भारतात सोनी कंपनीचे स्मार्टफोन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या जपान, यूरोप, तायवान, हाँगकाँग या ठिकाणी सोनी स्मार्टफोनच्या विक्रीवर लक्ष केंद्रीत करत आहेत. त्यामुळे कंपनीने सोनीच्या स्मार्टफोनचे प्रोडक्शन भारतात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याशिवाय सोनीची बीजिंग येथील स्मार्टफोन प्रोडक्शन थायलंडला हलवणार आहे.

विशेष म्हणजे सोनी कंपनीने, ऑपरेशन कॉस्टमध्ये 50 टक्क्यांनी घट करण्याची घोषणा केली आहे. भारतासह, आफ्रीका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, मैक्सिको आणि मध्य भारत यांसारख्या प्रमुख ठिकाणीही सोनी कंपनीचे स्मार्टफोन बिझनेस बंद करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणचे बिझनेस बंद करुन कंपनी जपान, युरोप, तायवान आणि हाँगकाँग या ठिकाणी सोनी स्मार्टफोनच्या बिझनेसवर लक्ष केंद्रीत करणार आहे. तसेच 2017 च्या तुलनेत सोनी कंपनीला 50 टक्के तोटा झाला आहे. यामुळे यंदाच्या आर्थिक वर्षात कंपनीने ऑपरेशनल कॉस्ट 57 टक्के ठेवणार आहे. याचा प्रमुख फायदा कंपनीला स्मार्टफोन बिझनेस वाढवण्यासाठी होणार आहे.

नुकत्याचा आलेल्या रिपोर्टनुसार, सोनी कंपनी 2020 च्या आर्थिक वर्षात स्मार्टफोन निर्मितीमध्ये 50 टक्के घट करणार आहे. याचा फटका सोनी कंपनीतील कर्मचाऱ्यांना बसणार आहे. यामुळे जवळपास 2 हजार लोकांना आपली नोकरी गमवावी लागण्याची शक्यता आहे. त्याशिवाय काही कर्मचाऱ्यांना सोनीच्या विविध कंपनीत नोकरीसाठी जावे लागणार आहे. सोनी कंपनीने हा निर्णय प्रामुख्याने नफा कमवण्यासाठी घेतला आहे.

Published On - 7:09 pm, Sat, 25 May 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI