AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Technology : सॅमसंगचा 50 MP असलेला स्मार्टफोन लाॅन्च, किंमत फक्त इतकी

हा हँडसेट मार्चमध्ये जागतिक बाजारात लॉन्च करण्यात आला आहे. यामध्ये तुम्हाला सॅमसंगचे रेग्युलर डिझाइन, वॉटरड्रॉप नॉच, साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळेल.

Technology : सॅमसंगचा 50 MP असलेला स्मार्टफोन लाॅन्च, किंमत फक्त इतकी
सॅमसंगImage Credit source: Social Media
| Updated on: Apr 18, 2023 | 6:09 PM
Share

मुंबई : सॅमसंगने (Samsung Smartphone) आपला नवीन स्मार्टफोन  सॅमसंग गॅलेक्सी M14 5G लॉन्च केला आहे. कंपनीने बजेट सेगमेंटमध्ये एक नवीन डिव्हाइस सादर केले असून तो 5G सपोर्टसह आहे. हा हँडसेट मार्चमध्ये जागतिक बाजारात लॉन्च करण्यात आला आहे. यामध्ये तुम्हाला सॅमसंगचे रेग्युलर डिझाइन, वॉटरड्रॉप नॉच, साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळेल. फोनमध्ये 6.6-इंचाचा डिस्प्ले, Exynos 1330 प्रोसेसर, अॅनराॅइड 13 आॅपरेटींग सिस्टम आणि 50MP रिअर कॅमेरा आहे.

जाणून घेऊया या स्मार्टफोनचे अधिक फीचर्स

  • सॅमसंग गॅलेक्सी   M14 5G ची किंमत आणि विक्री
  • कंपनीने हा डिवाइस दोन कॉन्फिगरेशनमध्ये लॉन्च केला आहे.  सॅमसंग गॅलेक्सी  M14 5G च्या 4GB RAM + 128GB स्टोरेज  व्हेरिएंटची
  • किंमत 13,490 रुपये आहे. तर त्याचा 6GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिएंट 14,990 रुपयांना आहे.

अॅमेझॉन आणि सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटवरून तुम्ही स्मार्टफोन खरेदी करू शकता. हा फोन 21 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता उपलब्ध होईल. ही एक प्रास्ताविक किंमत आहे, जी कंपनी नंतर सुधारू शकते.

या स्मार्टफोनची वैशिष्ट्ये खालील प्रमाणे

सॅमसंग गॅलेक्सी M14 5G मध्ये 6.6-इंचाचा FHD + IPS LCD डिस्प्ले आहे, जो 90Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येतो. स्क्रीनच्या संरक्षणासाठी कॉर्निंग गोरिला ग्लास 5 वापरण्यात आला आहे. हा स्मार्टफोन Exynos 1330 प्रोसेसरवर काम करतो. यात 6GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेज मिळते.

ऑप्टिक्सबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 50MP + 2MP + 2MP चा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. समोर 13MP सेल्फी कॅमेरा आहे. डिव्हाइस अॅनराॅइड 13 वर आधारित One UI 5.0 वर कार्य करते. स्मार्टफोनला पॉवर देण्यासाठी 6000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 25W चार्जिंगला सपोर्ट करते. यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळेल.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.