गुगल पिक्सेल 9 प्रो फोल्डवर 53 हजार रूपयांची बंपर सूट, जाणून घ्या ऑफर्स आणि स्पेसिफिकेशन
गुगलचा प्रीमियम फोल्डेबल फोन, पिक्सेल 9 प्रो फोल्ड, याच्या किमतीत 53,000 रुपयांची लक्षणीय घट झाली आहे. तर या बंपर सवलतीनंतर तुम्हाला हा फोन कोणत्या किंमतीत व कसा खरेदी करता येईल ते जाणून घेऊयात.
तुम्ही जर नवीन फोल्डेबल फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक आनंदाची बातमी आहे. कारण फ्लिपकार्टवर गुगल पिक्सेल 9प्रो फोल्ड या स्मार्टफोनवर सध्या मोठी बंपर ऑफर देण्यात आली आहे. 53 हजार रुपयांचा बंपर डिस्काउंट दिला जात आहे. या फोनमध्ये 8 इंचाचा मुख्य ओएलईडी डिस्प्ले आणि गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 प्रोटेक्शन आहे. फोनमध्ये तीन पॉवरफूल रियर कॅमेरे आणि एआय फीचर्स आहेत. तर या सवलतीसह गुगलचा हा फोन सॅमसंग आणि वनप्लसच्या फ्लॅगशिप फोल्डेबल फोनशी स्पर्धा करेल. चला तर मग या फोनवर उपलब्ध असलेल्या ऑफर्स आणि फीचर्सचा जाणून घेऊयात…
फ्लिपकार्टवर मोठी सूट उपलब्ध आहे
गुगल पिक्सेल 9 प्रो फोल्डची लाँच किंमत 1,72,999 रूपये इतकी होती, परंतु आता फ्लिपकार्टवर या फोनची किंमत 1,19,999 रूपयांमध्ये सूचीबद्ध केली आहे. याचा अर्थ फोनवर थेट 30% म्हणजे 53 हजार रूपयांची सूट देण्यात आलेली आहे. त्यासोबतच फोन खरेदीवर कार्ड डिस्काउंट आणि कॅशबॅक देखील उपलब्ध आहे. फ्लिपकार्ट अॅक्सिस आणि एसबीआय क्रेडिट कार्ड वापरल्याने तुम्ही थेट 4,000 वाचवू शकता. याव्यतिरिक्त, तुम्ही जुना फोन एक्सचेंज करून 61,900 रूपयांपर्यंत डिस्काउंट मिळवू शकता. जे की फोनच्या चांगल्या कंडीशनवर अवलंबून आहे. कंपनी नो-कॉस्ट ईएमआय आणि एक्सटेंडेड वॉरंटीसारखे ॲड-ऑन पर्याय देखील देत आहे.
गुगल पिक्सेल 9 प्रो फोल्डचे स्पेसिफिकेशन्स
या फोनमध्ये 6.3-इंचाचा OLED कव्हर डिस्प्ले आणि 8-इंचाचा मुख्य OLED डिस्प्ले असून दोन्ही 120Hz रिफ्रेश रेटसह येतो.
स्क्रीन गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 ने संरक्षित आहे आणि 2700निट्स पर्यंत पीक ब्राइटनेसला सपोर्ट करते. फोनमध्ये टेन्सर G4 चिपसेट, 4,650mAh बॅटरी आणि 45W फास्ट चार्जिंग आहे.
फोटो आणि व्हिडिओ अनुभव वाढवण्यासाठी गुगलने ॲड मी, ऑटो फ्रेम, मॅजिक लिस्ट आणि पिक्सेल स्टुडिओ सारख्या अनेक AI फिचर्सचा समावेश केला आहे.
कॅमेरा फिचर्स आणि कामगिरी
फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 48 मेगापिक्सेल ओआयएस-समर्थित मेन कॅमेरा, 10.5 मेगापिक्सेल अल्ट्रावाइड आणि 10.8 मेगापिक्सेल टेलिफोटो सेन्सर आहे. याव्यतिरिक्त यात दोन 10 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरे आहेत जे उत्कृष्ट नैसर्गिक रंग देतात. गुगलचा दावा आहे की टेन्सर जी4 चिप आणि एआय प्रोसेसिंग कमी प्रकाशात फोटोग्राफी आणि व्हिडिओ स्टेबेलाइलजेशन पहिल्यापेक्षा अधिक स्मूद आणि प्रोफेशनल लेव्हल पर्यंत दिले आहेत.
