AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या आठवड्यात भारतात लाँच होणार हे 3 नवे स्मार्टफोन्स, जाणून घ्या

या आठवड्यात भारतात तीन नवीन स्मार्टफोन लाँच होणार आहेत. चला तर मग आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात की कोणते फोन कोणत्या दिवशी लाँच होतील आणि त्यांची फिचर्स काय असतील, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

या आठवड्यात भारतात लाँच होणार हे 3 नवे स्मार्टफोन्स, जाणून घ्या
new smartphoneImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Mar 30, 2026 | 9:08 PM
Share

तुम्ही जर नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर थोडा वेळ थांबणे तुमच्यासाठी उत्तम आहे. कारण या आठवड्यात केवळ एक-दोन नव्हे, तर तब्बल तीन नवीन स्मार्टफोन्स लाँच होणार आहेत. Lava Bold N2 Pro, Redmi Note 15 SE 5G आणि Vivo V70 FE हे फोन्स या आठवड्यात कधी लाँचहोतील आणि या तिन्ही फोन्समध्ये कोणते फिचर्स असतील? चला आजच्या लेखात याबद्दल जाणून घेऊयात.

Lava Bold N2 Pro भारतात या दिवशी होणार लाँच

हा आगामी लावा फोन 31 मार्च रोजी दुपारी 12 वाजता ग्राहकांसाठी लाँच केला जाईल. लाँच झाल्यानंतर हा फोन कंपनीच्या वेबसाइटसोबतच फ्लिपकार्टवरही विक्रीसाठी उपलब्ध होईल. या फोनच्या फिचर्सबद्दल बोलायचे झाल्यास या फोनमध्ये 6.67-इंचाचा एचडी+ डिस्प्ले, 50-मेगापिक्सलचा एआय ट्रिपल रियर कॅमेरा, 4 जीबी व्हर्च्युअल रॅम, युनिसॉक टी7250 प्रोसेसर, धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी आयपी54 रेटिंग, 5000एमएएच बॅटरी आणि क्लीन ओएस एक्सपीरियन्स असेल, म्हणजेच हा फोन कोणत्याही ब्लोटवेअरशिवाय लाँच केला जाईल.

Redmi Note 15 SE 5G स्मार्टफोन लाँच तारीख

हा आगामी रेडमी फोन या आठवड्यात 2 एप्रिल रोजी भारतीय बाजारात लाँच केला जाईल. लाँच झाल्यानंतर हा हँडसेट कंपनीच्या वेबसाइटसोबतच अॅमेझॉनवरही विक्रीसाठी उपलब्ध होईल. तो तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल, परंतु त्याच्या फिचर्सविषयीची माहिती अद्याप सांगण्यात आलेली नाहीये.

Vivo V70 FE भारतात लाँच होण्याची तारीख

200-मेगापिक्सल कॅमेरा सेन्सर असलेले हे डिव्हाइस 2 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता ग्राहकांसाठी लाँच केले जाईल. लाँच झाल्यानंतर हा फोन कंपनीच्या वेबसाइटसोबतच ॲमेझॉनवरही उपलब्ध होईल. डार्कनेस ग्लो तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेला हा कंपनीचा पहिला फोन असेल. या फोनच्या फिचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 8-मेगापिक्सलचा वाइड-अँगल कॅमेरा, 200-मेगापिक्सलचा OIS प्रायमरी कॅमेरा सेन्सर आणि 50-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा सेन्सर असेल. यामध्ये AI फीचर्स, 30x सुपर झूम, 7000 mAh बॅटरी, 90 W फ्लॅश चार्ज, 1.5K अल्ट्रा क्लियर OLED डिस्प्ले, 120 Hz रिफ्रेश रेट, HDR10 प्लस आणि ड्युअल स्टिरिओ स्पीकर्स यांसारखी विशेष फिचर्स उपलब्ध असतील.

Follow Us
मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर
Breaking! मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर, प्रशासन अॅक्शन मोडमध्ये
'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं
Sunetra Pawar | 'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं भावनिक विधान
कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
Heavy Rain | कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! अचानक मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
NDAमध्ये शरद पवारांची एन्ट्री? जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्...
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्... भुस्खलनाचा थरारक व्हिडीओ समोर
मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
Amit Satam | मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही पूरस्थितीचा फटका
खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा
Navi Mumbai | खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता...
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता या शहरावर ओढावलं ढगफुटीचं संकट
संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा...
Ashadhi Wari 2026 | संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा, विठ्ठल... विठ्ठलच्या गजरात दुमदुमलं पैठण