महिलांसाठी हे खास स्मार्टवॉच लाँच, जाणून घ्या अत्याधुनिक फिचरबाबत

यात 34 मिमिचे वॉच केस, युनिक टी-बार लग्स आणि 6 क्लासिक कलर ऑप्शनसह 14 मिमी बँड देण्यात आला आहे. (this special smartwatch launches for women, know about the latest features)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 20:01 PM, 7 Mar 2021
महिलांसाठी हे खास स्मार्टवॉच लाँच, जाणून घ्या अत्याधुनिक फिचरबाबत
महिलांसाठी हे खास स्मार्टवॉच लाँच

नवी दिल्ली : अमेरिकन मल्टिनॅशनल तंत्रज्ञान कंपनी गार्मिनने रविवारी भारतीय बाजारात आपले नवीन स्मार्टवॉच लाँच केले आहे. या स्मार्टवॉचची किंमत 20,990 रुपये ठेवण्यात आली असून त्याचे नाव ‘लिली’ असे आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार या स्मार्टवॉचमध्ये महिलांच्या आरोग्याशी संबंधित अनेक फिचर्स आहेत, ज्यात मुख्यत्वे सायकल ट्रॅकिंग, नव्याने लॉन्च झालेल्या प्रेग्नन्सी ट्रॅकिंग फिचर आदिंचा समावेश आहे. गार्मिन इंडियाचे दिग्दर्शक अली रिझवी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्टाईलपासून ते आरोग्याची काळजी करण्यासाठी लिली हे एक अचूक घड्याळ आहे. आम्हाला आशा आहे की, या नवीन घड्याळाचा अधिकाधिक स्त्रियांना लाभ होईल, तसेच त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना निरोगी आयुष्य जगण्याची संधी मिळेल. (this special smartwatch launches for women, know about the latest features)

महिलांच्या गर्भधारणा आणि आरोग्यावर ठेवणार लक्ष

गार्मीन कनेक्ट अॅप आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या गार्मीन स्मार्टवॉचद्वारे महिला गर्भावस्थेसंबंधित विविध क्रिया जसे की बाळाच्या हालचालींचा मागोवा घेणे, रक्तातील ग्लुकोजच्या पातळीचे मूल्यांकन करणे, रिमाइंडर सेट करणे, व्यायाम आणि खाण्या-पिण्याशी संबंधित टिप्स मिळविणे इत्यादी. याशिवाय तणावाची पातळी, बॉडी बॅटरी देखील ट्रॅक केली जाऊ शकते आणि याच्या मदतीने खेळासंबंधी अनेक प्रकारच्या उपक्रमांचा आनंद देखील घेता येतो.

युनिक रंग आणि पॅटर्नमध्ये उपलब्ध

हे घड्याळ विशेषत: महिलांसाठी डिझाईन केलेले आहे आणि यात 34 मिमिचे वॉच केस, युनिक टी-बार लग्स आणि 6 क्लासिक कलर ऑप्शनसह 14 मिमी बँड देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त यात एक युनिक मेटेलिक पॅटर्नवाले लेन्स देण्यात आले आहे, जो ब्राईट लिक्विड क्रिस्टल मोनोक्रोक्रोमॅटिक टचस्क्रीन डिस्प्ले दर्शवितो आणि वापरात नसताना अदृश्य होतो.

गार्मीन वेणू एसक्यू(Garmin Venu SQ) स्मार्टवॉचही उपलब्ध

हे स्मार्टवॉच 6 दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह येईल. तसेच जीपीएस मोडमधील या स्मार्टवॉचला 14 दिवसांची बॅटरी मिळेल. नवीन वेणू एसक्यी सिरीजमध्ये 20 पेक्षा अधिक इनडोअर आणि आऊटडोअर स्पोर्टस अॅप बिल्ड आहेत. यात योगा, रनिंग, पूल, सायकलिंग आणि गोल्फचा समावेश आहे. म्युझिक एडिशन वॉचमध्ये फोन फ्री संगीत ऐकण्याची सुविधा असेल. यासह, डिव्हाईसमध्ये संगीत संग्रहित करण्याची सुविधा आहे. या व्यतिरिक्त या स्मार्ट वॉचमध्ये स्लीप ट्रॅकिंग, प्लस ऑक्स 2, रेसपिरेशन ट्रॅकिंग, हार्ट रेट अलर्ट (उच्च आणि निम्न), मासिक पाळी ट्रॅकिंग, तणाव ट्रॅकिंग सारख्या आरोग्य देखरेखीची वैशिष्ट्ये आहेत. स्मार्टवॉचमध्ये वर्कआऊट पर्याय असतील, जे स्मार्टवॉचमध्ये प्री-लोड असतील. (this special smartwatch launches for women, know about the latest features)

इतर बातम्या

“मरणाऱ्याची शेवटची इच्छा पूर्ण करतात, कृषी कायदे मागे घ्या”, दिल्लीत आणखी एका शेतकऱ्याची आत्महत्या

Mansukh Hiren Death Case | एटीएस मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा हत्येच्या अँगलनं तपास करणार