AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑनलाईन शॉपींगमध्ये ‘डील’च्या नावाखाली खिशाला चुना? हे १० सोपे उपाय वाचाच, हजारोंची बचत होईल!

‘अ‍ॅप ओपन करा, क्लिक करा आणि सामान घरी!’ ऑनलाईन खरेदी इतकी सोपी वाटत असली, तरी डील्सच्या नावाखाली फसवणूक होण्याचा धोका कितीतरी जास्त असतो! शिपिंग चार्ज, लपवलेले टॅक्स आणि नकली ऑफर्समुळे वस्तू मूळ किमतीपेक्षा दुप्पट महाग पडतात. पण काळजी नको फक्त ‘या’ १० स्मार्ट टीप्स पाळा आणि हजारोंची बचत अगदी सोप्या पद्धतीने करा!

ऑनलाईन शॉपींगमध्ये ‘डील’च्या नावाखाली खिशाला चुना? हे १० सोपे उपाय वाचाच, हजारोंची बचत होईल!
| Edited By: | Updated on: Apr 22, 2025 | 2:42 PM
Share

आजच्या काळात ऑनलाईन शॉपिंग ही फक्त सवय नव्हे तर अनेकांच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनली आहे.बाहेर जाण्यापेक्षा घरी बसल्या मोबाइलमधे ऍप ओपन करा, काही क्लिक करा आणि वस्तू घरी! पण या सोयीच्या मागे एक मोठा आर्थिक फसवा जाळं लपलेलं असतं! आकर्षक जाहिराती, ‘लिमिटेड पीरियड ऑफर्स’ आणि भारी डिस्काउंटच्या नावाखाली खिशाला कधी चटका लागतो, ते कळतही नाही. शिवाय शिपिंग चार्ज, लपलेले टॅक्स, नकली डील्स यामुळे खरी किंमत कितीतरी वेळा दुप्पट होण्याची शक्यता असते. त्यामुळे ऑनलाईन खरेदी करताना फक्त स्मार्टफोन स्मार्ट असून चालत नाही, तुमची शॉपिंग सवय देखील स्मार्ट असली पाहिजे!

हे १० टिप्स तुम्हाला ऑनलाइन खरेदी करताना उत्तम सवलत मिळून देण्यात मदत करतील..

1. खरेदी करण्यापूर्वी वस्तूंची स्पष्ट यादी तयार करा. यामुळे गरज नसलेल्या वस्तू खरेदी केल्या जात नाहीत आणि भावनेच्या भरात होणारा अनावश्यक खर्च टाळता येतो.

2. Amazon, Flipkart, Myntra किंवा संबंधित ब्रँडच्या अधिकृत वेबसाइटवर किंमतींची तुलना करा. थोडा वेळ काढून शोध घेतल्यास मोठी बचत होऊ शकते.

3. कोणतीही वस्तू ऑर्डर करताना ‘कूपन कोड’ किंवा ‘प्रोमो कोड’ वापरल्यास थेट सवलत मिळते. यामुळे खरेदीचा खर्च कमी होतो.

4. शक्य असेल तेव्हा एकत्र खरेदी करा आणि शिपिंग चार्ज वाचवा. अनेक वेबसाईट्स ठराविक रकमेच्या पुढे मोफत डिलिव्हरी देतात.

5. खरेदी करताना मिळणाऱ्या कॅशबॅकचा लाभ घ्या. परत मिळालेले पैसे पुढील खरेदीसाठी उपयोगी ठरतात.

6. इंस्टाग्राम, फेसबुक, टेलिग्रामसारख्या सोशल मीडियावर अनेक वेळा खास ऑफर्स आणि फ्लॅश सेल्सची माहिती मिळते. त्यामुळे, या डील्सवर नेहमी लक्ष ठेवावे.

7. महागड्या वस्तूंच्या किंमती खाली आल्याची त्वरित माहिती मिळवण्यासाठी प्राइस ट्रॅकर अ‍ॅप्सचा वापर करा.

8. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या कोणत्याही ब्रँडने नवीन मॉडेल लॉंच करताच मागील मॉडेल्सवर मोठ्या प्रमाणावर सवलत दिल्या जातात. त्यामुळे शक्यतो जूने मॉडेल्स विकत घेतल्यास तुमची बचत होऊ शकते.

9. कमी किमतीत Refurbished वस्तू खरेदी करता येतात. मात्र, खरेदीपूर्वी त्याची वॉरंटी आणि रिटर्न पॉलिसी काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

10. सणासुदीच्या काळात किंवा ‘Big Billion Days’ सारख्या मोठ्या सेलमध्ये वस्तू आश्चर्यकारक सवलतीत मिळतात. त्यामुळे या सेल्सची थोडी वाट पाहिली तर मोठी बचत होऊ शकते!

जर तुम्हाला ऑनलाइन खरेदी करताना सवलतींचा आनंद घ्यायचा असेल, तर तुम्ही या १० टिप्स फॉलो कराव्यात ज्यामुळे तुम्हाला हजारो रुपयांची बचत करता येईल.

अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.