Twitter Down : जगभरात ट्विटर डाऊन, कोट्यावधी युजर्सला फटका

सोशल नेटवर्किंग साईटवरील सर्वाधिक वापरलं जाणारे ट्विटर डाऊन झाले आहे. (Twitter down for many users)

Twitter Down : जगभरात ट्विटर डाऊन, कोट्यावधी युजर्सला फटका

नवी दिल्ली : सोशल नेटवर्किंग साईटवरील सर्वाधिक वापरलं जाणारे ट्विटर डाऊन झाले आहे. यामुळे अनेक युजर्सला त्याचा फटका बसला आहे. जगभरातील कोट्यावधी युजर्सला ट्विटर अकाऊंटवरील अपडेट दिसत नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत. (Twitter down for many users)

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 6 च्या दरम्यान अनेक ट्विटर युजर्सला ट्विट करताना अडचणी होत होत्या. कोणतेही ट्वीट करताना Try आणि ‘Something Went Wrong’ असे मॅसेज दिसत होते. यामुळे ट्विटरवर अॅक्टिव असलेल्या युजर्सना ट्वीट करता येत नव्हते. तसेच काहींना ट्वीट रिट्वीट करण्यातही अडचणी येत होत्या. यामुळे जगभरातील अनेक देशात #TwitterDown हा हॅशटॅगही सोशल मीडियावर ट्रेंड होत होता.

“तुमच्यापैकी अनेकांचे ट्विटर अकाऊंट डाऊन झाले आहे. आमच्या अंतर्गत सिस्टिममध्ये काही त्रुटी निर्माण झाल्या आहे. सध्या आम्ही त्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत. दरम्यान ही समस्या हँकिंग किंवा सुरक्षिततेच्या कारणात्सव आलेली नाही,” अशी माहिती ट्विटरकडून देण्यात आली आहे.

ऑगस्टमध्येही सव्वा तास ट्वीटर ठप्प 

दरम्यान ऑगस्टमध्येही अशाप्रकारे जगभरात ट्विटर ठप्प झाले होते. ट्विटरचा सर्व्हर डाऊन झाल्यामुळे ही समस्या निर्माण झाली होती. एकाच वेळी गरजेपेक्षा अधिक युजर ट्विटरवर सक्रीय झाल्याने हे सोशल मीडिया मायक्रोसाइट डाऊन झाल्याचं बोललं जात होतं.

त्यावेळी जवळपास सव्वा तास ट्वीटर ठप्प होते. त्यानंतर ट्विटर पुन्हा सुरू झाले. त्यावेळी ट्विटर ठप्प होण्याची काही कारणे सांगितली गेली असली, तर नेमकी कारणे कोणती होती हे मात्र स्पष्ट होऊ शकले नसल्याचे त्यावेळी अधिकृतपणे पुढे आले नव्हते. (Twitter down for many users)

संबंधित बातम्या :

Vodafone down | राज्यात व्होडाफोन-आयडियाचे मोबाईल नेटवर्क गायब, लाखो ग्राहकांना फटका

भारतात चायनीज वस्तूंच्या विक्रीत वाढ, Mi India कडून 50 लाखांपेक्षा अधिक टीव्हींची विक्री

Published On - 7:27 am, Fri, 16 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI