बहुप्रतीक्षित OnePlus 9RT ची किंमत आणि फीचर्स लीक, जाणून घ्या सर्वकाही

OnePlus RT या स्मार्टफोनची भारतातील किंमत जाहीर झाली आहे. वास्तविक, भारतीय ग्राहक अजूनही OnePlus 9RT ची वाट पाहात आहेत. मात्र हा फोन चीनमध्ये आधीच लॉन्च झाला आहे,

बहुप्रतीक्षित OnePlus 9RT ची किंमत आणि फीचर्स लीक, जाणून घ्या सर्वकाही
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Dec 06, 2021 | 12:18 PM

मुंबई : OnePlus RT या स्मार्टफोनची भारतातील किंमत जाहीर झाली आहे. वास्तविक, भारतीय ग्राहक अजूनही OnePlus 9RT ची वाट पाहात आहेत. मात्र हा फोन चीनमध्ये आधीच लॉन्च झाला आहे, T व्हर्जन भारतात दरवर्षी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरच्या सुरुवातीला लॉन्च केले जाते, यावर्षी मात्र त्यास उशीर झाला आहे. एका टिपस्टरने सांगितले आहे की, OnePlus RT लवकरच भारतीय बाजारात सादर केला जाईल, तसेच त्याने या फोनच्या संभाव्य किंमतीबद्दलही माहिती शेअर केली आहे. (Upcoming OnePlus 9RT price and features leaked ahead of launching)

भारतात, हा स्मार्टफोन 8 GB रॅम आणि 128 GB इंटर्नल स्टोरेजसह सादर केला जाईल. तसेच 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंट देखील मिळेल. चीनमध्ये 8 GB RAM व्हेरिएंट CNY 3,299 (सुमारे 38,800 रुपये) इतक्या किंमतीत लाँच करण्यात आलं आहे. भारतीय बाजारातील किमतही याच्या आसपास असेल. कंपनीने अद्याप या फोनच्या लाँचिंगबाबत कोणतीही अधिकृत माहिती शेअर केलेली नाही. हे डिव्हाईस भारतात OnePlus Care अॅपवर पाहायला मिळाले आहे, जे सूचित करते की, हा मोबाइल लवकरच भारतात दाखल होऊ शकतो.

भारतातील या मोबाइल फोनचे फीचर्स चीनमध्ये लॉन्च करण्यात आलेल्या व्हर्जनसारखेच असतील. यात 6.62 इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळेल. तसेच यामध्ये स्नॅपड्रॅगन 888 चिपसेट दिला जाईल. भारतात या स्मार्टफोनची किंमत नुकतीच उघड झाली आहे.

OnePlus 9RT चे स्पेसिफिकेशन्स

OnePlus 9RT चीनमध्ये लाँच झाला आहे. ज्यामध्ये 6.62-इंचांचा ई 4 एमोलेड डिस्प्ले आहे, जो 2400 x 1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह येतो. तसेच, त्याचा रिफ्रेश रेट 120 हर्ट्झ आहे. स्क्रीन प्रोटेक्शनसाठी कंपनीने कॉर्निंग गोरिल्ला ग्लास बसवला आहे.

OnePlus 9RT चा प्रोसेसर आणि रॅम

वनप्लस 9 आरटीच्या हार्डवेअरबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 चिपसेट वापरण्यात आला आहे, जो 12 जीबी पर्यंत रॅमसह येतो. तसेच, यात 256 GB UFS 3.1 इंटर्नल स्टोरेज मिळेल. हा स्मार्टफोन 19067.44 MM2 स्पेस कूलिंग सिस्टमसह येतो, जो गेमिंग दरम्यान स्मार्टफोन थंड ठेवतो.

OnePlus 9RT चा कॅमरा सेटअप

OnePlus 9RT च्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर, यात सोनी IMX766 चा सेन्सर आहे, ज्यामध्ये बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सल f / 1.8 अपर्चर आहे, त्यामध्ये 6P लेन्स देण्यात आली आहे. ऑप्टिकल आणि इलेक्ट्रॉनिक इमेज स्टेबिलायझेशन दोन्हीचे वैशिष्ट्य यामध्ये देण्यात आले आहे. तसेच, या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा सेन्सर आहे, जो 123 डिग्री फील्ड व्ह्यू कॅप्चर करू शकतो. तसेच, यात 2 मेगापिक्सल मॅक्रो लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

OnePlus 9RT ची बॅटरी

OnePlus 9RT मध्ये 4500 mAh बॅटरी आहे, जी 65 टी Wrap चार्जिंगसह येते. हा फोन Android 11 ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित ColorOS 12 वर सादर करण्यात आला आहे, परंतु इतर देशांमध्ये तो OxygenOS 12 सह लाँच होऊ शकतो. मात्र, भारतात लॉन्च झालेल्या वनप्लस 9 आरटी चे सर्व स्पेसिफिकेशन्स सारखेच असतील की त्यात काही बदल होतील हे अजून कळलेले नाही.

इतर बातम्या

Redmi Note 10S चं नवीन स्टोरेज व्हेरिएंट भारतात लाँच, किंमत…

8GB/128GB, 50MP कॅमेरासह Vivo Y55s बाजारात, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास

Iphone 12 vs Iphone 13 : फक्त किंमत आणि कॅमेराच नव्हे तर आणखी बरेच फरक, जाणून घ्या तुमच्यासाठी परफेक्ट मॉडेल कोणतं?

(Upcoming OnePlus 9RT price and features leaked ahead of launching)

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.