8GB/128GB, 64 MP रियर, 44MP सेल्फी कॅमेरासह Vivo चा 5G फोन लाँच, किंमत…

या स्मार्टफोनमध्ये दोन स्टोरेज ऑप्शन्स देण्यात आले आहेत. यापैकी 8GB + 128GB वेरिएंटची किंमत 29,990 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे

8GB/128GB, 64 MP रियर, 44MP सेल्फी कॅमेरासह Vivo चा 5G फोन लाँच, किंमत...
Vivo V21 5G
Follow us
| Updated on: Apr 29, 2021 | 5:30 PM

मुंबई : Vivo कंपनीने भारतात Vivo V21 5G स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशनबाबतची माहिती जाहीर करण्यात आली आहे. कंपनीने 800U SoC सह आपला लेटेस्ट मिड-रेंज स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. (Vivo V21 5G launched with 8 GB RAM, 64 MP rear amd 44 MP selfie camera, know price)

हा 5 जी स्मार्टफोन विवोचं सर्वात पातळ डिव्हाइस आहे ज्याची जाडी 7.29 मिमी इतकी आहे. हे डिव्हाइस 90 हर्ट्झच्या एमोलेड डिस्प्लेसह येतं. हे डिव्हाइस सर्वात आधी (27 एप्रिल रोजी) मलेशियात लाँच करण्यात आलं होते. त्यानंतर, 29 एप्रिल रोजी Vivo V21 5G हा स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 6.44-इंचाचा ई 3 एमोलेड डिस्प्लेसह डिय्रूडॉप नॉच, 800 निट्स पीक ब्राइटनेस आणि एचडीआर 10 प्लस सपोर्टसह सादर करण्यात आला आहे.

Vivo V21 5G ची कीमत

या स्मार्टफोनमध्ये दोन स्टोरेज ऑप्शन्स देण्यात आले आहेत. यापैकी 8GB + 128GB वेरिएंटची किंमत 29,990 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. तर 8GB + 256GB स्टोरेज असलेल्या Vivo V21 ची किंमत 32,990 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. हा फोन डस्क ब्लू, सनसेट डॅझल आणि आर्क्टिक व्हाइट कलरमध्ये सादर करण्यात आला आहे. फ्लिपकार्टच्या माध्यमातून या फोनची विक्री केली जाणार आहे. 6 मेपासून हा फोन फ्लिपकार्टवर उपलब्ध असेल.

Vivo V21 चे स्पेसिफिकेशन्न

  • Vivo V21 5G मध्ये 20: 9 आस्पेक्ट रेश्यो असलेला 6.44-इंचांचा FHD + AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यामध्ये HDR10 + सपोर्टसह 90Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले मिळेल.
  • हा स्मार्टफोन 44MP OIS फ्रंट कॅमेरा आणि वाटरड्रॉप नॉच डिस्प्लेसह येतो. हा सेल्फी कॅमेरा आय ऑटोफोकससह येतो. Vivo V21 5G मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट रीडरही आहे.
  • फोनच्या मागच्या बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये OIS सह 64 MP चा प्रयमरी सेंसर आहे. फोन 8 एमपी अल्ट्रावाइड शूटर आणि 2 एमपी मॅक्रो युनिटसह येतो.
  • या डिव्हाईसमध्ये एक मीडियाटेक डाइमेन्सिटी 800U SoC प्रोसेसर आहे जो 8GB रॅम आणि 128GB इंटर्नल स्टोरेजसह येतो.
  • फोन 33W फास्ट-चार्जिंग सपोर्ट आणि 4,000 एमएएच बॅटरीसह येतो. हा फोन अँड्रॉयड 11 आधारित फनटच ओएस 11.1 वर चालतो.
  • कनेक्टिव्हिटी ऑप्शन्समध्ये 4 जी, 5 जी, वाय-फाय, ब्लूटूथ 5.1, एक यूएसबी टाइप-सी पोर्ट, माइक्रोएसडी कार्ड स्लॉट आणि अनेक वेगवेगळे फीचर्स देण्यात आले आहेत.
  • Vivo V21 5G मध्ये एक्सटेंडेड रॅम फीचरही देण्यात आलं आहे. ज्यामुळे हा फोन रॅमच्या रुपात 3 जीबी एक्स्ट्रा मेमरी स्पेसचा वापर करण्याची परवानगी देतो.

इतर बातम्या 

64MP कॅमेरासह Redmi चा पहिला गेमिंग स्मार्टफोन लाँच, किंमत…

8GB/128GB, 48MP क्वाड कॅम, 5000mAh बॅटरी, Samsung चा किफायतशीर 5G स्मार्टफोन लाँच

6000mAh बॅटरी, 108MP कॅमेरा, Moto G60 आणि Moto G40 चा सेल सुरु

(Vivo V21 5G launched with 8 GB RAM, 64 MP rear amd 44 MP selfie camera, know price)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.