जबरदस्त ट्रिपल कॅमेरासह VIVO चा नवा 5G फोन लाँच, किंमत…

चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी VIVO ने गेल्या वर्षी Vivo X60, Vivo X60 Pro आणि Vivo X60 Pro+ स्मार्टफोन ग्लोबली लाँच केले होते.

जबरदस्त ट्रिपल कॅमेरासह VIVO चा नवा 5G फोन लाँच, किंमत...
Vivo X60t
Follow us
| Updated on: Apr 04, 2021 | 11:59 AM

मुंबई : चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी VIVO ने गेल्या वर्षी Vivo X60, Vivo X60 Pro आणि Vivo X60 Pro+ स्मार्टफोन ग्लोबली लाँच केले होते. आता कंपनीने चीनी बाजारात Vivo X60t फोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन काही अंशी Vivo X60 सारखाच आहे. प्रामुख्याने यामधील प्रोसेसर वेगळा आहे. (Vivo X60t smartphone launched with triple camera sensor, know price and features)

Vivo X60t स्मार्टफोनमध्ये तुम्हाला MediaTek Dimensity 1100 SoC चिपसेट मिळेल. तर Vivo X60 स्मार्टफोन Snapdragon 870 SoC प्रोसेसरने सुसज्ज आहे. Vivo X60t च्या किंमतीबाबत बोलायचे झाल्यास हा फोन चीनमध्ये 3,498 चीनी युआन (जवळपास 39,000 रुपये) इतक्या किंमतीसह लाँच करण्यात आला आहे. हा फोन शिमर ब्लू आणि मिडनाइट ब्लॅक कलर ऑप्शनसह लाँच करण्यात आला आहे. यामध्ये तुम्हाला 8GB RAM आणि 128GB स्टोरेजचा पर्याय मिळेल.

Vivo X60t चे स्पेसिफिकेशन्स

हा स्मार्टफोन अँड्रॉइड 11 बेस्ड OriginOS 1.0 वर चालतो. या ड्युअल नॅनो सिम स्मार्टफोनमध्ये 6.56 इंचाचा फुल एचडी + (1,080 × 2,376 पिक्सेल) सेंटर्ड पंच होल AMOLED डिस्प्ले आहे आणि त्याचा आस्पेक्ट रेशियो 19.8 : 9 असा आहे.

Vivo X60t मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे, जो OIS सह 48 मेगापिक्सलच्या प्रायमरी सेन्सरसह सादर करण्यात आला आहे. यात 2 एक्स टेलिफोटो लेन्ससह 13 मेगापिक्सलचा सेन्सर आणि 120 डिग्री अल्ट्रा वाइड अँगल लेन्ससह 13 मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात आला आहे. या सेटअपचे मुख्य आकर्षण म्हणजे ZEISS ऑप्टिक्स आणि ट्यूनिंग. तसेच या स्मार्टफोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी फ्रंट पंच होलवर 32 मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात आला आहे.

या फोनच्या स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास यात 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटर्नल स्टोरेज स्पेस आहे. याशिवाय या फोनमध्ये 4,300 mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 33 वॅट फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे. या फोनच्या कनेक्टिव्हिटीबद्दल सांगायचे झाल्यास हा हँडसेट 5 जी, वायफाय 6, ब्लूटूथ 5.2, एनएफसी सपोर्टेड आहे.

Vivo X60 Pro मध्ये काय आहे खास?

स्मार्टफोन निर्माता कंपनी Vivo ने आपल्या प्रतिस्पर्ध्यांना जोरदार टक्कर देण्यासाठी गेल्या आठवड्यात आपला नवीन स्मार्टफोन एक्स 60 प्रो चे अनावरण केले. Vivo X60 Pro, Vivo X60 आणि Vivo X60 Pro Plus लाँच करण्यात आले आहेत. Vivo X60 Pro मध्ये 12 जीबी रॅम प्लस, 256 जीबी स्टोरेजसह सिंगल स्टोरेज व्हेरिएंट्स देण्यात आले आहे. याची किंमत 49,990 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन मिडनाइट ब्लॅक आणि शिमर ब्लू या कलर ऑप्शन्समध्ये सादर करण्यात आला आहे. या फोनचे सर्वात मोठे फीचर म्हणजे तो क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 870 एसओसी आणि गिम्बल स्टेबिलायझेशनसह 48 एमपी रिअर कॅमेराने सुसज्ज आहे. विवोने मागील वर्षी ग्रेटर नोएडामध्ये मॅन्युफॅक्चरिंग युनिट असलेल्या एक्स-सिरीजद्वारे भारतात प्रीमियम स्मार्टफोन विभागात प्रवेश केला.

या फोनच्या डिझाईनबद्दल बोलायचे झाल्यास हा फोन Vivo X50 Pro प्रमाणेच आहे. त्याचे वजन 177 ग्रॅम इतके आहे. या डिव्हाइसवरील व्हॉल्यूम आणि पॉवर बटणे उजव्या बाजूला वरच्या बाजूस आहेत. याशिवाय फोनमध्ये स्पीकर ग्रिल, यूएसबी-सी पोर्ट आणि ड्युअल सिम स्लॉट आहेत. बेझेल्स, कर्व्ड स्क्रीन आणि डिस्प्लेच्या वरच्या बाजूला देण्यात आलेल्या पंच होल डिझाईनमुळे फोनला अधिक आकर्षक लुक मिळाला आहे. या फोनच्या इतर वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर फोनमध्ये एमोलेड पॅनेलसह 6.56 इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले आहे, ज्याचा रीफ्रेश रेट 120 हर्ट्ज इतका आहे, जो फुल एचडी प्लस रेझोल्यूशन देतो.

शानदार कॅमेरा

या फोनची सर्वात खास गोष्ट म्हणजे तुम्ही भर उन्हातही हा फोन वापरत असाल तरी या फोनची स्क्रीन स्पष्ट दिसते. फोनच्या पॅनेलमध्ये 800 निट्स अधिक ब्राइटनेस आहे. या फोनच्या कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाल्यास या स्मार्टफोनमध्ये एफ/1.48 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, एफ/2.2 अपर्चरचा 13 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा आणि एफ/2.46 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा 2 एक्स टेलिफोटो शूटर कॅमेरासुद्धा आहे.

ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन

या स्मार्टफोनमध्ये सेल्फीसाठी एफ / 2.45 अपर्चरसह 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. म्हणजेच, फोनमध्ये कॅमेरा सेटअप उत्कृष्ट आहे. हा फोन ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 870 प्रोसेसरद्वारे सपोर्टेड आहे. हा फोन फनटच ओएस 11.1 आधारित अँड्रॉइड 11 वर चालतो. याशिवाय फोनमध्ये 4200 एमएएच बॅटरी आहे, जी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. एकंदरीत, उत्कृष्ट डिझाइन, उत्कृष्ट कॅमेरा सेटअप आणि शक्तिशाली चिपसेटमुळे Vivo X 60 Pro एक सॉलिड डिव्हाइस ठरतो.

इतर बातम्या

दमदार कॅमेरा असलेल्या Vivo X60 series ची किंमत लीक, जाणून घ्या फीचर्स

मोबाईल फुटला, डिस्प्ले गेला, डोन्ट वरी, हा 7 हजाराचा स्मार्टफोन घ्या आणि निश्चिंत राहा

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.