AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Voter ID | मतदान ओळखपत्रावरील फोटो बदलवायचाय? मग फॉलो करा या स्टेप्स

Voter ID | अनेकदा मतदान ओळखपत्र तयार करताना गडबडीत फोटो व्यवस्थित येत नाही. कॅमेऱ्याची क्वालिटी, फोटो छोट्या चौकटीत बसवताना तो कम्प्रेस करण्यात येत असल्याने तो व्यवस्थित दिसत नाही. तुम्हाला हा फोटो घरबसल्या या सोप्या पद्धतीने बदलता येतो...

Voter ID | मतदान ओळखपत्रावरील फोटो बदलवायचाय? मग फॉलो करा या स्टेप्स
असा बदलावा फोटो झटपटImage Credit source: गुगल
| Updated on: Mar 21, 2024 | 2:26 PM
Share

नवी दिल्ली | 21 March 2024 : लोकसभा निवडणूक 2024 मध्ये प्रत्येक जण मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आतूर झाला आहे. वोटर आयडी हा कोणत्याही भारतीय नागरिकासाठी एक महत्वाचा पुरवा आहे. मतदानावेळी पुरावा म्हणून हे ओळखपत्र उपयोगी ठरते. तर इतर ठिकाणी पण ते उपयोगी पडते. मतदान ओळखपत्र अद्ययावत असणे गरजेचे आहे. तुम्हाला मतदान ओळखपत्रावरील फोटो आवडला नसेल तर तो सहज बदलता येतो. त्यासाठी सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत नाहीत. या सोप्या पद्धतीने तुम्ही घरबसल्या मतदान ओळखपत्रावरील फोटो बदलवू शकता.

मतदार यादीत असे तपासा तुमचे नाव

मतदार यादीत तुमचे नाव आहे की नाही? हे कसं माहिती करुन घेणार, तर एकमद सोपं आहे. तुम्हाला ही यादीच तपासावी लागेल. त्यासाठी सर्वात अगोदर तुमचा फोन वा लॅपटॉपच्या मदतीने https://electoralsearch.eci.gov.in/ या संकेतस्थळावर जा. याठिकाणी एक नवीन पेज उघडेल. त्याठिकाणी तुम्हाला तीन पर्याय दिसतील. Search by Details, Search by EPIC and Search by Mobile या आधारे तुम्ही नाव तपासू शकता.

मतदान ओळखपत्रावरील बदला फोटो

मतदान ओळखपत्रात अनेकदा फोटो चांगला दिसत नाही. कॅमेऱ्याची लो क्वालिटी, फोटो छोट्या चौकटीत बसवताना तो कम्प्रेस करण्यात आल्याने तो ओळखपत्रावर अंधूक अथवा काळपट दिसतो. तो व्यवस्थित दिसत नाही. तुम्हाला हा फोटो घरबसल्या या सोप्या पद्धतीने बदलता येतो.

मतदान ओळखपत्रावरील फोटो असा बदलवा

  1. सर्वात अगोदर नॅशनल वोटर्स सर्व्हिस पोर्टलवर https://www.nvsp.in/ जा
  2. येथे Correction In Voter ID चा पर्याय मिळेल, यावर क्लिक करा
  3. तुम्हाला वोटर मित्र चॅटबॉट पाठविण्यात येईल
  4. तुमचा मतदान ओळखपत्र क्रमांक मागण्यात येईल. तो जमा करा.
  5. तुमच्याकडे Voter ID Number नसेल तर वोटर आयडी क्रमांक नाही, यावर क्लिक करा
  6. त्यानंतर इलेक्टोरल रोलचा तपशील द्यावा लागेल
  7. तुमच्या मतदार संघातील मतदान ओळखपत्राची यादी समोर येईल. त्यात वोटर आयडी निवडा.
  8. येथे तुम्हाला मतदान ओळखपत्रात बदल का करायचे याचे कारण नमूद करावे लागेल.
  9. त्यानंतर योग्य ती माहिती भरून आधार क्रमांक नोंदवावा लागेल.
  10. फोटो बदलण्यासाठी नवीन फोटो अपलोड करावा लागेल.
  11. त्यानंतर Continue पर्यायावर क्लिक करा
  12. सर्वात शेवटी एक रेफरेंस क्रमांक समोर येईल. तो जपून ठेवा.
  13. हा क्रमांक तुम्हाला स्टेट्स चेक करण्यासाठी उपयोगी ठरेल.
  14. त्यानंतर काही वेळातच तुमचा फोटो वोटर आयडीवर अपडेट होईल.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.