Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Google Gemini | गुगल जेमिनीमुळे तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती, हे तंत्रज्ञान आहे तरी काय?

Google Gemini | कृत्रिम बुद्धीमतेच्या जगतात मोठं-मोठ्या घडामोडी घडत आहेत. ओपनएआय कंपनीत भूंकप झाला. तर ओपनएआयला मायक्रोसॉफ्टने धक्का दिला. त्यांचे दोन दिग्गज माणसं आता मायक्रोसॉफ्टकडे आली आहे. तर इकडे Google ने Gemini या प्रकल्पावर लक्ष केंद्रीत केले आहे. काय आहे हा प्रकल्प, काय येईल क्रांती?

Google Gemini | गुगल जेमिनीमुळे तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती, हे तंत्रज्ञान आहे तरी काय?
Follow us
| Updated on: Nov 21, 2023 | 11:42 AM

नवी दिल्ली | 21 नोव्हेंबर 2023 : Tech जगतात सध्या शीतयुद्ध सुरु आहे. अनेक घाडमोडी आणि उलाढाली होत आहेत. जगात त्याविषयी कुणकुण असली तरी या विश्वातील अनेक गोष्टी अद्याप बाहेर आलेल्या नाहीत. कृत्रिम बुद्धीमतेच्या विश्वातील मोठे हादरे समोर आले आहेत. OpenAI मध्ये भूकंप आला आहे. सॅम ऑल्टमन आणि ग्रेग ब्रॉकमन हे बाहेर पडले आहेत. मायक्रोसॉफ्टमध्ये त्यांची एंट्री झाली आहे. तर इकडे गुगल कंपनीचा महत्वकांक्षी प्रकल्प Gemini ची जोरदार चर्चा रंगली आहे. या नवीन प्रकल्पामुळे यापूर्वीच्या Google Bard ची चर्चा मागे पडली आहे. काय आहे गुगल जेमिनी प्रकल्प?

Google BARD ची चर्चा

कंपनीने Google BARD चे अधिकृत लाँचिंग केले आहे. हे AI चॅटबॉट आहे. दीर्घकाळापासून लोक याची प्रतिक्षा करत होते. मायक्रोसॉफ्टचे ChatGPT चे नवीन BING, यामध्ये युझर्सला अनेक सुविधा मिळतात. Bing आणि ChatGPT ला टक्कर देण्यासाठी Google BARD मैदानात उतरविण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

काय आहे Google Gemini?

पण गुगल तंत्रज्ञानाचा विस्तार करणार आहे. कंपनीने bard च्या पुढे जाण्याची योजना आखली आहे. जेमिनी हा गुगलचा एआय चा भविष्यातील प्लॅटफॉर्म आहे. बार्ड, गुगलच्या लॅग्वेंट मॉड्यूल PaLM 2 वर आधारित आहे. तर जेमिनी हे तंत्रज्ञानातील त्यापुढील पाऊल आहे. यामुळे युझर्सला एकाच प्लॅटफॉर्मवर अनेक सुविधा आणि तंत्रज्ञानाचा वापर करता येईल. पुढील पिढीचे तंत्रज्ञान विकसीत करण्यासाठी जेमिनी मैदानात उतरणार आहे. हे तंत्रज्ञानाचे सुवर्ण युग असेल आणि आम्ही त्याची वाट पाहत असल्याचे, इनोव्हेशन क्षेत्रातील हे दमदार पाऊल असे सीईओ सुंदर पिचाई यांनी विश्वास व्यक्त केला.

काय जेमिनी देणार ChatGPT ला टक्कर?

Gemini हे मल्टिमॉडल कॅपेबिलिटीसह येत आहे. युझर्सला एकाचवेळी, एकाच प्लॅटफॉर्मवरुन अनेक कामे करता येतील. म्हणजे टेक्स्ट, कोड आणि ईमेज जनरेट आणि रीड सर्व एकाच ठिकाणी होईल. ChatGPT केवळ टेक्स्ट मॉडेल आहे. त्याच्या मदतीने चित्र तयार करता येत नाही की छायाचित्र शेअर करता येत नाही.

80 प्रवाशांना घेऊन जाणारं प्लेन क्रॅश, लॅडिंगदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल
80 प्रवाशांना घेऊन जाणारं प्लेन क्रॅश, लॅडिंगदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल.
कमाल खानने सर्व मर्यादा ओलांडल्या,'त्या' वादग्रस्त पोस्टवरून CM आक्रमक
कमाल खानने सर्व मर्यादा ओलांडल्या,'त्या' वादग्रस्त पोस्टवरून CM आक्रमक.
'आता तसं होईल असं वाटत नाही', पक्षाला रामराम अन् मातोश्रीपुढं नतमस्तक
'आता तसं होईल असं वाटत नाही', पक्षाला रामराम अन् मातोश्रीपुढं नतमस्तक.
'माझं लेकरू...', सुप्रिया सुळेंसमोर संतोष देशमुखांच्या आईचा कंठ दाटला
'माझं लेकरू...', सुप्रिया सुळेंसमोर संतोष देशमुखांच्या आईचा कंठ दाटला.
'फडणवीसांनी शिंदेंना एक साबण द्यावा अन्...', संजय राऊतांचा निशाणा
'फडणवीसांनी शिंदेंना एक साबण द्यावा अन्...', संजय राऊतांचा निशाणा.
आरोपांचं गँग्स ऑफ वासेपूर ते सुरेश धस यांची माणूसकीची भेट
आरोपांचं गँग्स ऑफ वासेपूर ते सुरेश धस यांची माणूसकीची भेट.
रायगड पालकमंत्रिपदाच्या वादानंतर आता खेळाच्या मैदानात राजकीय बॅटिंग
रायगड पालकमंत्रिपदाच्या वादानंतर आता खेळाच्या मैदानात राजकीय बॅटिंग.
'ऑपरेशन टायगर'मध्ये पुढचा नंबर कोणाचा? भास्कर जाधव की...
'ऑपरेशन टायगर'मध्ये पुढचा नंबर कोणाचा? भास्कर जाधव की....
'खरोखर माफ करा, पण मी वचन देते...', सुळेंनी देशमुख कुटुंबाला दिला शब्द
'खरोखर माफ करा, पण मी वचन देते...', सुळेंनी देशमुख कुटुंबाला दिला शब्द.
दादा... धनंजय मुंडेंवर ठोस भूमिका घ्या, शिंदेंच्या सेनेची सीधी बात
दादा... धनंजय मुंडेंवर ठोस भूमिका घ्या, शिंदेंच्या सेनेची सीधी बात.