4G आणि 5G नेटवर्कमध्ये नेमका काय फरक? 6Gची चाचपणी कधीपासून? समजून घ्या सोप्या शब्दात
भारतात काही मोजके टक्के लोकं सोडले तर प्रत्येक जण मोबाईल वापरतो. आता मोबाईल हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. पण तुम्ही कधी विचार केला आहे का? 4G आणि 5G नेटवर्कमधील नेमका फरक काय? पुढे यात आणखी अपग्रेडेशन होणार आहे. चला जाणून घेऊयात सविस्तर

तंत्रज्ञानाच्या युगात आपण आता वावरत आहोत. प्रत्येक गोष्ट आता आपल्याला एका क्लिकवर हवी आहे. त्यामुळे त्रास वाचतो आणि कामही पटापट होतात. यासाठी सर्वात महत्त्वाची वस्तू ठरते ती म्हणजे मोबाईल.. मोबाईलवर एपच्या माध्यमातून अनेक कामं सोप्या पद्धतीने होतात. पण कामं पटापट होण्यासाठी मोबाइलचं नेटवर्कही तितकंच महत्त्वाचं आहे. तुमच्या मोबाईलला नेटवर्क नसेल तर मग कितीही महागडा फोन असला तर त्याचा काही एक उपयोग नाही. गेल्या काही वर्षात मोबाईल नेटवर्कमध्ये कमालीची प्रगती झाली आहे. जगभरात आता 5G नेटवर्क वापरलं जात आहे. भविष्यात 6G नेटवर्क येईल अशी चर्चाही रंगली आहे. त्यासाठी आतापासूनच पायाभरणी सुरु झाली आहे. तु्म्ही 2G नेटवर्क असल्यापासून मोबाईल वापरत असाल तर तुम्हाला फरक दिसून येईल. एखादा व्हिडीओ डाउनलोड होणं किंवा ऑनलाइन पाहण्यासाठी होणारं बफर यात किती फरक पडला आहे. आता 6G नेटवर्कसाठी भारत सज्ज झाला आहे. 2030 पर्यंत म्हणजेच येत्या 5 वर्षात देशात या नेटवर्कचं जालं विणलं जाणार आहे. मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये पंतप्रधान मोदींनी सांगितले की, भारत 6G लाँच करणाऱ्या पहिल्या...
