उठ-सूट कुणालाही ग्रुपमध्ये अॅड करणाऱ्यांना चाप, व्हॉट्सअपचं खास फीचर

उठ-सूट कुणालाही ग्रुपमध्ये अॅड करणाऱ्यांना चाप, व्हॉट्सअपचं खास फीचर

या फीचरमुळे तुमच्या परवानगीशिवाय कुणीही ग्रुपमध्ये समाविष्ट करु शकणार नाही. या फीचरचा लाभ आता जास्तीत जास्त ग्राहकांना दिला जातोय.

सचिन पाटील

| Edited By:

Oct 22, 2019 | 6:48 PM

मुंबई : WhatsApp ने काही दिवसांपूर्वी भारतीय युझर्ससाठी एका खास फीचरची घोषणा केली होती. विशेषतः ग्रुपच्या प्रायव्हसीसंदर्भात हे फीचर (WhatsApp group privacy setting) आहे. हे फीचर अँड्रॉईड आणि आयओएस ग्राहकांसाठी हे फीचर (WhatsApp group privacy setting) दिलं जाणार असल्याचं कंपनीने म्हटलं होतं. या फीचरमुळे तुमच्या परवानगीशिवाय कुणीही ग्रुपमध्ये समाविष्ट करु शकणार नाही. या फीचरचा लाभ आता जास्तीत जास्त ग्राहकांना दिला जातोय.

WABetainfo च्या रिपोर्टनुसार, कंपनीकडून या फीचरचा सपोर्ट वाढवला जातोय. WhatsApp ने अखेर आपल्या बहुप्रतिक्षित फीचरचा आवाका वाढवला आहे. ग्रुप प्रायव्हसी सेटिंग आता जास्तीत जास्त अँड्रॉईड आणि आयओएस ग्राहकांना दिली जात आहे. अनेक ग्राहकांना त्यांची इच्छा नसतानाही ग्रुपमध्ये समाविष्ट केलं जातं, असं WABetainfo च्या ब्लॉगमध्ये म्हटलं आहे.

नव्या फीचरचा वापर कसा कराल?

अनेक ग्राहक या फीचरचा आनंद घेत आहेत. कुणी न विचारताच तुम्हाला ग्रुपमध्ये समाविष्ट केल्यास त्यातून बाहेर पडण्याचा पर्याय तर आहेच, पण सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही अगोदरच या फीचरचा फायदा घेऊ शकता. सेटिंगमध्ये जाऊन Account>Privacy>Group या मार्गाने तुम्हाला सेटिंग निवडता येईल.

ग्रुप प्रायव्हसी सेटिंगमध्ये तुम्हाला काही पर्याय मिळतील. यामध्ये Everyone, My Contacts आणि Nobody हे पर्याय देण्यात आले आहेत. तुम्ही Nobody हा पर्याय निवडल्यास तुम्हाला कुणीही परवानगीशिवाय ग्रुपमध्ये समाविष्ट करु शकणार नाही. कुणी परवानगीशिवाय समाविष्ट करत असेल तर Nobody मुळे तुम्हाला एक विनंती येईल, जी तुम्ही स्वीकारु किंवा नाकारु शकता.

WhatsApp च्या ग्रुप प्रायव्हसी सेटिंगमध्ये Nobody फीचरला अपडेटही करण्यात आलंय. याऐवजी आता My contacts except हा पर्याय देण्यात आलाय. म्हणजेच तुम्ही एका विशिष्ट व्यक्तीने तुमचा ग्रुपमध्ये समावेश करु नये याचीही काळजी घेऊ शकता.

वृत्तानुसार, हे फीचर आयओएसच्या बिटा अपडेटमध्ये रिलीज करण्यात आलंय, पण सर्वांसाठी कधी उपलब्ध होईल हे अजून सांगण्यात आलेलं नाही.

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें