AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

5 मे पासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp चालणार नाही, का ते घ्या जाणून

5 मे पासून WhatsApp अनेक स्मार्टफोनवर काम करणे थांबवणार आहे. दरवर्षी WhatsApp अशा फोनची यादी जारी करते जे खूप जुने आहेत आणि ज्यांसाठी कंपनीने सॉफ्टवेअर अपडेट देणे बंद केले आहे. WhatsApp सेवा बंद करणाऱ्या फोनची यादी आपण या लेखातुन जाणून घेऊयात...

5 मे पासून 'या' स्मार्टफोन्समध्ये WhatsApp चालणार नाही, का ते घ्या जाणून
स्मार्टफोन
| Edited By: | Updated on: May 02, 2025 | 3:53 PM
Share

5 मे पासून अनेक स्मार्टफोन्समध्ये असलेल्या व्हॉट्सॲप काम करणे बंद करणार आहे. दरवर्षी व्हॉट्सॲपअशा फोन्सची यादी जारी करते जे खूप जुने आहेत आणि अशा फोनकरिता कंपनीने सॉफ्टवेअर अपडेट्स देणे बंद केले आहे. WhatsApp फक्त iOS 15.1 किंवा त्यावरील वर्जनमध्ये काम करेल. म्हणजेच ज्या लोकांकडे iPhone 5s, iPhone 6आणि iPhone 6 Plus आहेत. त्यांच्या फोनवर व्हॉट्सॲप चालणार नाही. त्या लोकांना व्हॉट्सॲप सेवा सुरू करण्यासाठी नवीन डिव्हाइस घ्यावा लागेल.

मेटा व्हॉट्सॲपसपोर्ट का बंद करत आहे?

व्हॉट्सॲप आपल्या वापरकर्त्यांच्या सोयी सुधारण्यासाठी आणि त्यांची गोपनीयता मजबूत करण्यासाठी सतत काम करत असते. त्यामुळे दरवर्षी ते जुन्या उपकरणांची यादी जाहिर करतात जे व्हॉट्सॲपकरिता सुरक्षित नाहीत. ज्यामध्ये अपडेटेड फीचर्स काम करणार नाहीत. तसेच कंपनीने सॉफ्टवेअर अपडेट्स देणे बंद केले असेल. त्याचबरोबर ज्या आयफोन मॉडेल्ससाठी ॲपल सुरक्षा अपडेट देत नाही, त्या मॉडेल्समध्ये डेटा चोरी किंवा व्हायरसचा धोका वाढतो. यामध्ये व्हॉट्सॲप बिझनेस अ‍ॅपचाही समावेश आहे.

या आयफोन मॉडेल्सवर व्हॉट्सॲप चालत राहील

व्हॉट्सॲप सर्व जुन्या मॉडेल्सवरील त्यांचा सपोर्ट काढून टाकत नाहीये. iPhone 8 आणि iPhone X ला अजूनही व्हॉट्सअॅप सपोर्ट मिळत राहील. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की कंपनी या मॉडेल्सना सॉफ्टवेअर अपडेट्स देत नाहीये. त्यानुसार, येत्या काही वर्षांत या उपकरणांवर व्हॉट्सॲप सपोर्ट उपलब्ध होणे बंद होण्याची शक्यता आहे.

ते टाळण्यासाठी हे उपाय करा

जर तुम्ही दररोज व्हॉट्सॲप वापरत असाल तर असा स्मार्टफोन खरेदी करण्याचा प्रयत्न करा ज्यामध्ये नवीनतम सॉफ्टवेअर असेल. तुम्ही सेकंड हँड आयफोन खरेदी करत असलात तरी सॉफ्टवेअरकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. नवीन सॉफ्टवेअर अपडेटसह फोन खरेदी करण्याचा फायदा असा आहे की तुम्हाला WhatsApp च्या नवीनतम वैशिष्ट्यांचा – चॅट लॉक, डिसपायरिंग मेसेज फीचर आणि प्रायव्हसी सेटिंग्जचा देखील फायदा मिळेल.

शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं.
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!.
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?.
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?.