WhatsApp युजर्ससाठी खुशखबर! चॅट बबलचा लूक बदलणार, चॅटिंग एक्सपीरियन्स सुधारण्यावर भर

फेसबुकचे इन्स्टंट चॅट अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप संपर्कासाठी जगातील सर्वात जास्त वापरले जाणारे मेसेजिंग अ‍ॅप आहे यात कोणतीही शंका नाही. वेळोवेळी व्हॉट्सअ‍ॅप आपले फीचर्स अपडेट करत राहते.

WhatsApp युजर्ससाठी खुशखबर! चॅट बबलचा लूक बदलणार, चॅटिंग एक्सपीरियन्स सुधारण्यावर भर
WhatsApp

मुंबई : फेसबुकचे इन्स्टंट चॅट अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप संपर्कासाठी जगातील सर्वात जास्त वापरले जाणारे मेसेजिंग अ‍ॅप आहे यात कोणतीही शंका नाही. वेळोवेळी व्हॉट्सअ‍ॅप आपले फीचर्स अपडेट करत राहते. आता एका रिपोर्टनुसार, व्हॉट्सअ‍ॅप आपल्या चॅट मेसेजचा लुक अपडेट करत आहे. (WhatsApp updates its iOS beta app with redesigned chat bubbles)

व्हॉट्सअ‍ॅप अपडेट्स फॉलो करणारे एक ऑनलाइन पब्लिकेशन WABetainfo ने दिलेल्या माहितीनुसार वापरकर्त्यांना व्हॉट्सअ‍ॅपची नवीन बीटा आवृत्ती टेस्टिंगसाठी जारी केली गेली आहे. या नवीन बीटा व्हर्जनमध्ये चॅट बबल्सना नवीन रूप देण्यात आले आहे. चला तर मग जाणून घेऊया व्हॉट्सअ‍ॅपचे हे नवीन अपडेट कसे आहे…

व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये काय बदल होईल?

व्हॉट्सअ‍ॅप चॅट बबल आता कोपऱ्यांवर पूर्वीपेक्षा अधिक गोलाकार असेल. या व्यतिरिक्त, WABetainfo च्या मते, हा चॅट बबल आता पूर्वीपेक्षा मोठा असेल आणि त्याचा बॅकग्राउंड कलर देखील पूर्वीपेक्षा जास्त गडद रंगात पाहायला मिळेल.

हे अपडेट फक्त आयफोन वापरकर्त्यांसाठी आहे. याचा अर्थ असा की, हे अपडेट केवळ आयफोन वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असेल. Android प्लॅटफॉर्मसाठी हे अपडेट कधी मिळेल, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे अँड्रॉईड वापरकर्त्यांना या अपडेटची सध्या प्रतीक्षा करावी लागेल.

चॅट न उघडता वाचा मेसेज, सेंडरला ब्लू टिक पोहोचणार नाही

काही वापरकर्ते व्हॉट्सअ‍ॅप मेसेज गुप्तपणे वाचण्यासाठी बऱ्याच पद्धती वापरतात, काही वेळा ते सेटिंग्जमध्ये जाऊन रीड रिपोर्टही बंद करतात, परंतु ते बंद करून, तुम्हाला ब्लू टिक रिपोर्ट देखील मिळू शकत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही सहजपणे गुप्तपणे मॅसेज वाचू शकाल.

व्हॉट्सअ‍ॅपवर कोणत्याही वापरकर्त्यांचे संदेश वाचण्यासाठी, होम स्क्रीनवर विजेट(Widgets) वापरावे लागते. यासाठी, होम स्क्रीनवर थोडा वेळ क्लिक करा आणि धरून ठेवा. यानंतर, स्क्रीनच्या तळाशी वॉलपेपर आणि विजेट्स(Widgets)सारखे पर्याय दिसतील. विजेट्स(Widgets)वर क्लिक केल्यानंतर, व्हॉट्सअॅपच्या शॉर्टकटवर जा आणि तेथे 4X2 हा पर्याय निवडा.

याच्या व्हॉट्सअ‍ॅपसह विजेट्सवर क्लिक करा आणि धरून ठेवा आणि होम स्क्रीनवर आणा. यानंतर, त्यावर क्लिक करा आणि थोडा वेळ धरून ठेवा, जेणेकरून हे विजेट्स मोठे करता येतील. हे लक्षात ठेवा की, जर स्क्रीनवर अधिक आयकॉन असतील, तर हे विजेट्स मोठे होणार नाहीत, त्यासाठी त्यांना रिकाम्या होम स्क्रीनवर ठेवा. यानंतर, त्यात फक्त तेच संदेश दिसतील, जे वापरकर्त्यांनी अद्याप उघडलेले नाहीत. संपूर्ण संदेश त्यात दृश्यमान असेल, जो न उघडता वाचता येईल. यासाठी कोणतेही अॅप्स वगैरे इन्स्टॉल करण्याची गरज नाही. वनप्लस 7 प्रो स्मार्टफोनवर ही चाचणी केली आहे.

नवीन व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप फीचर्स

शेवटच्या बीटा अपडेटमध्ये व्हॉट्सअ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप युजर्ससाठी काही नवीन फिचर्स सादर करणार आहे. अँड्रॉइडसाठी व्हॉट्सअ‍ॅप 2.21.20.2 बीटा नवीन ग्रुप आयकॉन एडिटर फीचर आणणार आहे. युजर्स ग्रुप आयकॉन डेव्हलप करुन शकतील, ज्यांचा वापर इमेजेसऐवजी ग्रुप प्रोफाईल फोटोच्या रुपात होईल. ग्रुप आयकॉनसह युजर्स हवा तो बॅकग्राऊंड कलर निवडू शकतात.

इतर बातम्या

6GB/256GB, 50 MP कॅमेरासह ओप्पोचा किफायतशीर स्मार्टफोन लाँच, अमेझॉनवर डिस्काऊंट

8-inch HD डिस्प्ले, दमदार प्रोसेसरसह Moto Tab G20 भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Flipkart Big Billion Days 2021 : Flipkart बिग बिलियन डेज 2021 मध्ये उपलब्ध असलेले टॉप स्मार्टफोन्स

(WhatsApp updates its iOS beta app with redesigned chat bubbles)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI