‘सर्जिकल स्ट्राईकचं श्रेय घेता, अवनीच्या पापाचंही घ्या’

मुंबई: सुधीरभाऊ बंदूक घेऊन गोळी मारायला गेले नव्हते असं मुख्यमंत्री म्हणतात. मग सर्जिकल स्ट्राईकला मोदीदेखील बंदूक घेऊन गेले नव्हते. सैनिकांच्या शौर्याचं श्रेय घेणार असाल, तर अवनी वाघिणीला गोळी मारल्याचं पापही सुधीरभाऊ आणि सरकारने घ्यायला हवं, असा हल्लाबोल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. ते मुंबईत बोलत होते. अवनी वाघिणीच्या हत्येवरुन सध्या देशभरात खळबळ उडाली आहे. […]

'सर्जिकल स्ट्राईकचं श्रेय घेता, अवनीच्या पापाचंही घ्या'
Follow us
| Updated on: Nov 10, 2018 | 3:21 PM

मुंबई: सुधीरभाऊ बंदूक घेऊन गोळी मारायला गेले नव्हते असं मुख्यमंत्री म्हणतात. मग सर्जिकल स्ट्राईकला मोदीदेखील बंदूक घेऊन गेले नव्हते. सैनिकांच्या शौर्याचं श्रेय घेणार असाल, तर अवनी वाघिणीला गोळी मारल्याचं पापही सुधीरभाऊ आणि सरकारने घ्यायला हवं, असा हल्लाबोल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. ते मुंबईत बोलत होते.

अवनी वाघिणीच्या हत्येवरुन सध्या देशभरात खळबळ उडाली आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर विरोधक तर निशाणा साधत आहेतच, शिवाय भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनीही टीकास्त्र सोडलं. त्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही मुनगंटीवार आणि भाजपवर हल्ला चढवला.

न्यायालयीन चौकशी करा

उद्धव ठाकरे म्हणाले, “अवनी वाघीण प्रकरणी कमिटी स्थापन करुन चौकशी हे एक नाटक आहे.  ज्यांना शिकारीसाठी नेमले त्यांना न्यायमूर्ती म्हणून नेमले. याप्रकरणाची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे.  ती निःपक्षपातीपणे व्हायला हवी”

इतकंच नाही तर मुख्यमंत्र्यांनी गोळ्या झाडलेल्यांचा सत्कार करायला हवा असा टोला उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

टी वन वाघिणीला गोळी मारल्याप्रकरणी चौकशी  होणार

टी वन वाघिणीला ठार केल्याप्रकरणी चौकशी केली जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं. ते मुंबईत बोलत होते.  वाघिणीला ठार मारणे हे दु:खदायक होतं असंही मुख्यमंत्री म्हणाले.

यवतमाळमधील नरभक्षक वाघिणीला शुक्रवारी 2 नोव्हेंबरच्या  रात्री गोळी घालून ठार करण्यात आलं. याप्रकारानंतर प्राणीप्रेमींकडून निषेध व्यक्त होत आहे. खुद्द केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री मेणका गांधी यांनी या घटनेचा निषेध नोंदवत, महाराष्ट्र सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं.

वाघिणीचा खात्मा

तब्बल 13 जणांची शिकार करणाऱ्या नरभक्षक टी-1 वाघिणीचा खात्मा करणाऱ्यात अखेर दीड महिन्यांनी यश आलं. शार्प शूटर अजगर अलीने शुक्रवारी 2 नोव्हेंबरच्या  रात्री एकच्या सुमारास टी-1 वाघिणीला अचूक टिपत तिला गतप्राण केलं. टी-वाघिणीचा खात्मा होताच, गेल्या अनेक दिवसांपासून भयभीत अवस्थेत जगणाऱ्या यवतमाळच्या राळेगावातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडत एकच जल्लोष केला.

संबंधित बातम्या 

मध्यरात्री शार्प शूटरचा नेम बसला, नरभक्षक वाघिणी ठार झाली! 

वाघिणीला ठार करणाऱ्या शार्प शूटरची धारदार प्रतिक्रिया 

अवनीच्या हत्येची चौकशी करु : मुख्यमंत्री 

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.