माझी कबर खोद… 20 वर्षानंतर बापाने स्वप्नात येऊन सांगितलं; मुलाने कबर खोदताच जे निघालं…
उत्तर प्रदेशातील कोशंबी जिल्ह्यात एक आश्चर्यकारक घटना घडली आहे. 20 वर्षांपूर्वी निधन झालेल्या मौलाना अंसार अहमद यांचे शरीर त्यांच्या कबरीत अखंड अवस्थेत सापडले आहे. त्यांच्या मुलाने स्वप्नात वडिलांचा संदेश मिळाल्यानंतर कबरीची तपासणी केली असता हे आश्चर्यकारक दृश्य समोर आले.

कुठे कोणती आश्चर्यकारक घटना घडेल याचा काही नेम नाही. उत्तर प्रदेशच्या कोशंबी जिल्ह्यात एक आश्चर्यकारक घटना घडली आहे. 20 वर्षांपूर्वी मृत्यूमुखी पडलेल्या मौलानाच्या कब्रमध्ये त्यांचे शरीर तसंच सुरक्षित असल्याचे समोर आले. हा मौलाना मुलाच्या स्वप्नात आला. त्याने मुलाला आपल्या कबरीची डागडुजी करायला सांगितली. त्यानंतर या मुलाने कब्र खोदली आणि त्याला धक्काच बसला. 20 वर्षापूर्वी त्याच्या वडिलांचा मृतदेह त्याने जसा दफन केला होता, तसंच शरीर त्याला दिसलं. शरीराचं मांस अजितबात गळालेलं नव्हतं. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
ही घटना सिराथू तालुक्याच्या दारानगर नगर पंचायतमधील आहे. येथील अख्तर सुब्हानी यांनी सांगितले की, 2003 मध्ये त्यांचे वडील मौलाना अंसार अहमद यांचे निधन झाले होते आणि त्यांना स्थानिक कब्रिस्तानात दफन केले गेले होते. त्यानंतर वडील 20 वर्षांनी अचानक अख्तरच्या स्वप्नात आले आणि त्यांनी आपल्या कबरीची डागडुजी करायला सांगितलं. अख्तरने त्याच्या कुटुंबीयांना हे स्वप्न सांगितलं आणि त्यांनी कब्रस्तानात धाव घेतली. तेव्हा त्याच्या वडिलांची कब्र पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली होती. कबरीची डागडुजी करण्यासाठी त्यांनी बरेलवी समुदायाच्या मौलानाची अनुमती घेतली.
मृतदेह सुरक्षित मिळाला
कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी कबर खोदण्यास सुरुवात केली. तेव्हा सर्व लोक आश्चर्यचकित झाले. कारण मौलाना अंसार सुब्हानी यांचे शरीर अगदी तसंच सुरक्षित होतं, जसे त्यांना दफन केलं होते. नंतर कबर स्वच्छ करून त्यांना पुन्हा दफन करण्यात आले आणि कबर व्यवस्थित बांधली. सामान्यत: जेव्हा मृतदेह कबरीत ठेवला जातो, तेव्हा काही दिवसांनंतर ते कुजून जातं. पण मौलाना अंसारांचे शरीर 20 वर्षांनंतरही तसंच सुरक्षित आहे, ही आश्चर्याची गोष्ट आहे, असं लोकांचं म्हणणं आहे.
अंतिम संस्काराच्यावेळी मौलानांचा मृतदेह जसा होता, तसाच त्यांचा मृतदेह पाहून त्यांच्या घरातील लोक भावूक झाले आहेत. हा दैवी चमत्कार असल्याचं सांगितलं जात आहे. दारानगरमधील लोकही या गोष्टीमुळे आश्चर्यचकित झाले आहेत. असं कसं होऊ शकतं? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर काही लोक तर याला अफवा म्हणून सांगत आहेत. ही घटना गेल्या वर्षीची आहे. पण सध्या ती तुफान व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर ही बातमी वेगाने व्हायरल होत आहे.