AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतात काम करताना अचानक गायब झाला शेतकरी, झोपडीतून आवाज आला… आत डोकावून पाहताच गावकऱ्यांचा उडला थरकाप

एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 26 फूट अजगराने चक्क जिवंत माणसाला गिळले आहे.

शेतात काम करताना अचानक गायब झाला शेतकरी, झोपडीतून आवाज आला... आत डोकावून पाहताच गावकऱ्यांचा उडला थरकाप
PythonImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jul 08, 2025 | 5:15 PM
Share

इंडोनेशियातील सुलावेसी बेटावर एक हादरवणारी घटना समोर आली आहे. येथे 63 वर्षीय एका शेतकऱ्याचा मृतदेह 26 फूट लांब विशाल अजगराच्या पोटात सापडला आहे. गावकऱ्यांना जेव्हा हा अजगर दिसला, तेव्हा त्याचे फुगलेले पोट पाहून ते चकित झाले. त्यांनी अजगराचे पोट चिरले असता त्यातून शेतकऱ्याचा मृतदेह सापडला.

ही घटना साउथ बुटोन जिल्ह्यातील मजापहित गावातील आहे. आपदा व्यवस्थापन एजन्सी (BPBD) चे आपत्कालीन आणि लॉजिस्टिक विभागाचे प्रमुख ला ओडे रिसावाल यांच्या माहितीनुसार, पीडित शेतकरी शुक्रवारी सकाळी आपल्या शेतात गेला होता, परंतु तो परत आला नाही. रात्री उशिरापर्यंत तो घरी न परतल्याने कुटुंबाने तक्रार नोंदवली आणि गावकऱ्यांनी त्याचा शोध सुरू केला.

Video: निळ्या रंगाचा नाग? शेतकऱ्याने काढी मारली तेवढ्यात… व्हिडीओ पाहून उडेल थरकाप

अजगराचे पोट चिरले तेव्हा सर्वजण अवाक्

शोधमोहिमेदरम्यान गावकऱ्यांना शेताजवळ शेतकऱ्याची मोटरसायकल उभी असलेली आढळली. तिथेच जवळच्या एका झोपडीजवळ एक विशाल अजगर अस्वस्थपणे लोळताना दिसला. गावकऱ्यांना संशय आला की अजगराने काही मोठे प्राणी गिळले आहे. जेव्हा त्यांनी अजगराला मारले आणि त्याचे पोट चिरले, तेव्हा सर्वजण थक्क झाले… त्यातून शेतकऱ्याचा मृतदेह बाहेर आला. रिसावाल यांनी सांगितले की, पावसाळ्यात गावात अजगर अनेकदा पाळीव प्राण्यांवर हल्ला करताना दिसतात. परंतु, या परिसरात प्रथमच अशी घटना घडली आहे, जिथे अजगराने जिवंत माणसाला गिळले.

गावात दहशतीचे वातावरण

या घटनेची पुष्टी करताना गावचे सुरक्षा अधिकारी सेर्तु डिर्मन यांनी सांगितले की, मृतदेह सापडताच गावकरी आणि पोलिसांनी मिळून तो शेतकऱ्याच्या घरी नेला. गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे आणि प्रशासन आता परिसरातील सापांच्या वाढत्या संख्येवर लक्ष ठेवण्याची योजना आखत आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी 2017 मध्ये इंडोनेशियातील सुलावेसी बेटावरील सुलबिरो गावातही अशीच एक घटना घडली होती. तेव्हा 25 वर्षीय अकबर नावाच्या तरुणाचा मृतदेह 23 फूट लांब अजगराच्या पोटात सापडला होता. त्या वेळीही अजगराचे फुगलेले शरीर पाहून गावकऱ्यांनी त्याला मारून मृतदेह बाहेर काढला होता.

इंडोनेशिया आणि फिलीपिन्समध्ये आढळणारे हे अजगर अनेकदा 20 फुटांपेक्षा जास्त लांब असतात. साधारणपणे ते छोट्या प्राण्यांचा शिकार करतात, परंतु माणसांवर हल्ले करणे दुर्मीळ मानले जाते. तरीही, अलीकडील घटना या गोष्टीचा इशारा देतात की माणसांबरोबरही अशा दुर्घटना घडू शकतात.

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.