गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड फिरायला निघाले, लोकांनी पकडून थेट… Viral Video पाहून चकीत व्हाल!
कल्पना करा, डेटला निघालेला प्रियकर-प्रेयसीचा जोडा एका झटक्यात ‘नवरा-बायको’ बनला. लग्नानंतर मुलीने मंदिरातूनच सासरी जाण्यासाठी निरोप घेतला. एका गावात घडलेली ही विचित्र घटना संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली आहे.

अनेकदा कपल हे बाहेर फिरायला जातात. घरच्यांपासून लपून, गपचूप एकमेकांना भटतात. पण कल्पना करा तुम्हा गर्लफ्रेंडसोबत एका डेटवर निघाले आहात आणि रस्त्यात असे काही घडते की हे कपल झटक्यात तुम्ही नवरा-बायको झाले आहेत. लग्नानंतर मुलीला घरीही जाता येत नाही थेट तिची रवानगी सासरी करण्यात आली. हे एकदम फिल्मी जरी वाटत असले तरी खरे आहे. एका गावात खरच असे झाले आहे.
नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशच्या गोंडा जिल्ह्यात एक आश्चर्यकारक घटना घडली, ज्याने सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. एक प्रेमी जोडपे बाइकवर फिरत होते. जेव्हा गावकऱ्यांनी त्यांना अडवले आणि पुढे जे घडले त्याची कोणी कल्पनाही केली नसेल. गावकऱ्यांनी तिथल्याच मंदिरात या जोडप्याचे लग्न लावून दिले आले. ही घटना खोड़ारे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली, जिथे बैजपुर गावातील 19 वर्षीय सोनू मौर्या आणि खम्हरिया गावातील निशा मौर्या यांच्यात बऱ्याच काळापासून प्रेमसंबंध होते. सोनूचे खम्हरिया मार्केटमध्ये चहाची दुकान आहेत आणि निशाचे घर जवळच आहे.
वाचा: 19-20 वर्षाच्या मुलींना माझा व्हिडीओ… प्राजक्ता माळीने सांगितला धक्कादायक अनुभव
View this post on Instagram
मंदिरात लावून दिले लग्न
रविवारी जेव्हा हे प्रेमी जोडपे बाइकवर फिरत होते, तेव्हा गावकऱ्यांनी त्यांना अडवले. त्यानंतर जे काही ठरले, ते सर्वांना चकित करणारे होते. गावकऱ्यांनी तात्काळ दोघांच्या कुटुंबीयांना बोलावले आणि मग एक अनोखे लग्न सुरू झाले. असे सांगितले जाते की, दोन्ही कुटुंबांच्या संमतीने खम्हरिया गावातील एका मंदिरात या प्रेमी जोडप्याचे लग्न लावून देण्यात आले. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये सोनू आणि निशा एकमेकांच्या गळ्यात हार घालताना दिसत आहेत. उत्साही गावकऱ्यांच्या टाळ्यांच्या गजरात सोनूने आपल्या प्रेयसीच्या कपाळावर कुंकू लावले. यावेळी कुटुंबीयांनीही आनंदाने टाळ्या वाजवल्या.
कल्पना करा, डेटला निघालेला प्रियकर-प्रेयसीचा जोडा एका झटक्यात ‘नवरा-बायको’ बनले. लग्नानंतर निशाने मंदिरातूनच सासरी जाण्यासाठी निरोप घेतला. ही विचित्र घटना संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली आहे आणि ‘झटपट लग्न’चा हा व्हिडीओ इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे.
