तो 20 मिनिटं मेला… त्यानंतर जिवंत होताच त्याने जे काही सांगितलं… असं काय दिसलं त्याला?

स्कॉट ड्रमोंड यांना 20 मिनिटे मृत घोषित करण्यात आले होते. त्यांच्या मृत्यूनंतरच्या अनुभवात त्यांनी एक सुंदर बाग आणि एक रहस्यमय व्यक्ती पाहिली. त्यांच्या आयुष्याची पुनरावलोकन झाले आणि त्यांना परत पाठवण्यात आले. त्यांच्या कथेने मृत्यूनंतरच्या जगात लोकांचे कुतूहल वाढवले आहे.

तो 20 मिनिटं मेला... त्यानंतर जिवंत होताच त्याने जे काही सांगितलं... असं काय दिसलं त्याला?
Scott Drummond Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 05, 2025 | 1:58 PM

मृत्यूनंतर जग कसं असतं? मेल्यावर काय होतं? माणूस मरतो म्हणजे कुठे जातो? स्वर्ग, नर्क असतो का? पुढचा जन्म मिळतो का? या प्रश्नाने माणसाला आजच नाही तर प्राचीन काळापासून भांडावून सोडलं आहे. माणसाच्या अस्तित्वापासून माणसाला हे प्रश्न पडले आहेत. त्यामुळेच अधूनमधून कोणी तरी मेल्यावर जिवंत होतो आणि स्वर्गात जाऊन आल्याचं सांगत असतो. या कहाण्या नेहमी प्रसिद्ध होतात. आता या मालिकेत एका व्यक्तीचं नाव जोडलं गेलं आहे. हा माणूस 20 मिनिटं मेला. या 20 मिनिटात त्याने काय काय पाहिलंय हे त्याने सांगितलं. सध्या त्याची ही मुलाखत बरीच चर्चेत आहे. विशेष म्हणजे मृत्यूनंतरच्या जगावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याबाबतचं अधिकच कुतुहूल वाटत आहे.

स्कॉट ड्रमोंड असं या व्यक्तीचं नाव आहे. सध्या त्यांचं वय 60 वर्ष आहे. वयाच्या 28व्या वर्षी त्यांचा अपघात झाला होता. त्यांच्या अंगठ्याला जबर मार लागला होता. त्यांचं ऑपरेशनही झालं होतं. या ऑपरेशनच्यावेळी त्यांना मृत घोषित करण्यात आलं होतं. मात्र, 20 मिनिटानंतर ते जिवंत झाले. त्यानंतर त्यांनी मृत्यूनंतरचा अनुभव सांगितला. मेल्यानंतर मी नर्सला ऑपरेशन थिएटरमध्ये ओरडताना पाहिलं. मी त्याला मारून टाकलं, असं ती म्हणत होती, असं स्कॉट म्हणाले.

ती रडत गेली, म्हणाली…

माझ्या हातात आणि काळजात काही तरी जात आहे, असं मला ऑपरेशनवेळी वाटत होतं. माझ्या अंगठ्याला टाके मारले जात होते, ते मला दिसत होते. माझ्या जवळ एक व्यक्ती होती, मला ते जाणवत होतं. कदाचित तो देव असावा. त्यावेळी नर्सला वाटलं मी मेलोय. त्यामुळे ती रडतच ऑपरेशन थिएटरच्या बाहेर पडली. त्यानंतर अचानक कोणी तरी मला सुंदर बगिचा आणि हिरव्या रानात घेऊन गेलं, स्कॉट सांगत होता.

हे सुद्धा वाचा

मला तसे आदेश होते

मला आठवतंय, तेव्हा मी मागे वळून पाहिलं नाही. कदाचित मागे वळून न पाहण्याचे मला आदेश दिले गेले असतील. त्यानंतर मी एका शेतात गेलो. ती व्यक्ती (देव) माझ्या बाजूलाच उभी होती. वास्तविक मी त्यांना पाहू शकत नव्हतो. माझ्या डाव्या हाताला मोठमोठे पण अत्यंत वेगळेच वृक्ष होते. तर दुसरीकडे जंगली फूल होते, असंही त्याने सांगितलं.

माझ्या कर्माचा न्याय होत होता

जी व्यक्ती मला घेऊन गेली, त्याच्या आणि माझ्याशिवाय तिथे कुणीच नव्हतं. माझ्या जवळून पांढरे शुभ्र ढग गेले. अचानक मला माझ्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा व्हिडीओ माझ्यासमोर दिसला. माझी जर्नी मी पाहिली. माझ्या आयुष्यात मी जे काही चांगले वाईट कामं केली. ती मला दिसत होती. माझ्या कर्माचा न्याय होत होता, असं तो म्हणतो.

एक मजबूत हात आला आणि म्हणाला…

त्यानंतर त्यांच्या एका गाइडने मला टेलिपॅथिक पद्धतीने उठायला आणि ढगांवरून चलायला सांगितलं. त्याचवेळी या ढगांमधून एक मजबूत हात माझ्या दिशेने आला. त्याने माझा हात घट्ट पकडला आणि म्हणाला, तुझी वेळ अजून आलेली नाही. तुला अजूनही कामं करायची आहेत. नंतर जसा तो हात मागे गेला, इकडे पृथ्वीवर मी माझ्या शरीरात परतलो, असं स्कॉट म्हणाला. मला त्या जागेवरून परत यायचं नव्हतं. ती एक सुंदर आणि शांत जागा होती. पण जेव्हा मी जागा झालो, तेव्हा मला मरून 20 मिनिटे झाल्याचं मला कळलं. त्यामुळे मला आश्चर्य वाटलं, असंही त्याने सांगितलं.

'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?
'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?.
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी.
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला.
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका.
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा.
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ.
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री.
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?.
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले...
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले....