Video : पॅराग्लायडिंग करताना घाबरलेल्या तरूणाला आलियाचा सल्ला, काही सेकंदात शांत, पाहा नेमकं काय म्हणाली…

Video : पॅराग्लायडिंग करताना घाबरलेल्या तरूणाला आलियाचा सल्ला, काही सेकंदात शांत, पाहा नेमकं काय म्हणाली...

हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर खूप जास्त व्हायरल होत आहे. याला एक लाखांहून अधिक लोकांनी लाईक केलंय. 

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: आयेशा सय्यद

May 12, 2022 | 5:55 PM

मुंबई : पॅराग्लायडिंग (Paragliding) करताना अंगावर अक्षरश: काटा येतो. अनेकांना भिती वाटते पण यावर अभिनेत्री आलिया भटने (Alia Bhatt) एक ट्रिक शोधून काढली आहे. त्याचा व्हीडिओ सध्या चर्चेत आहे. काही वर्षांपूर्वी एका व्यक्तीच्या व्हीडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. ही व्यक्ती पॅराग्लायडिंग करताना ‘भाऊ, मला सहन नाही होत, प्लीज कसं तरी मला खाली उतरवा’ अशं म्हणताना दिसत होती. ती व्यक्ती म्हणजे विपिन कुमार… विपिन कुमार (Vipin Kumar) आणि आलिया या व्हीडिओत दिसत आहेत.

व्हायरल व्हीडिओ

विपिन कुमार आलिया भट्ट यांचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात आलियासोबत विपिन पॅराग्लायडिंग करताना दिसत आहे. या व्हीडिओमध्ये विपिन कुमार ज्या स्टाईलमुळे चर्चेत आला तीच गोष्ट करताना दिसत आहे. यात तो चारो तरफ कोहरा… मै पागल था जो वापस यहीं आ गया… भाई लंबी राईड नहीं करानी, भाई लॅन्ड करादे भाई …, असं म्हणताना तो दिसत आहे. त्यावर आलिया त्याला एक आयडिया देते. त्याच्या समोर कॅडबरी पर्क पकडते अन् त्याच्या डोक्याला हात लावते. पर्क खा लाईट व्हा, अशी याची टॅग लाईन आहे. पर्कच्या जाहिरातीत आलिया आणि विपिन पहिल्यांदाच एकत्र पाहायला मिळत आहेत.

ही जाहिरात कॅडबरी पर्क चॉकलेटची आहे. विपिन कुमारने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हीडिओ शेअर केला आहे. यासोबत त्याने कॅप्शनही कास दिलं आहे. “कोण म्हणतं की एक मीम उंची गाठू शकत नाही? कोण म्हणतो की मेमचे आयुष्य एक किंवा दोन महिने असते? या सर्व गोष्टी बकवास आहेत. आलिया भट्टसोबत अॅड शूट केली”, असं कॅप्शन त्याने दिलं आहे. यासोबतच विपिन कुमारने आलिया भट्टचेही आभार मानले आणि कॅडबरीचेही आभार मानले. तो म्हणाला की, “हे माझ्यासाठी स्वप्नवत आहे.”

हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर खूप जास्त व्हायरल होत आहे. याला एक लाखांहून अधिक लोकांनी लाईक केलंय.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें