गुप्त इतिहास आला समोर, खोदकामात 1600 वर्षांपूर्वीचा मिळाला खजिना, शास्त्रज्ञांना नगरच सापडले
Ancient Tomb Discovery : अनेक सभ्यता काळाच्या ओघात लुप्त झाल्या. गुप्त झाल्या. पण काळाचाच चमत्कार म्हणा अथवा अन्य काही, हा हरवलेला इतिहास लख्खपणे आपल्यासमोर येतो, तेव्हा खजिनाच मिळतो. आता पण असाच मोठा खजिना हाती लागला आहे.

दक्षिण अमेरिकेतील बेलिज या देशातील घनदाट जंगलात एक रहस्य उलगडले आहे. येथे एका प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत. त्यामुळे इतिहासाने पुन्हा नवीन वळण घेतले आहे. पुरातत्वशास्त्रज्ञांना प्राचीन माया शहर कॅराकोलच्या पहिल्या शासकाची भव्य कबर सापडली आहे. 1600 वर्षांपूर्वी या प्राचीन शहराचा पाया त्याने घातला होता. या राजाचे नाव कआब चाक असे होते. माया भाषेत त्याचा अर्थ झाडाच्या फाद्यांसह पावसाचा देव असा होतो. ह्युस्टन विद्यापीठाच्या संशोधक चमूने 10 जुलै रोजी त्याची अधिकृत घोषणा केली.
40 वर्षांपूर्वी सुरू झाले खोदकाम
गुरूवारी या टीमने एक अधिकृत वक्तव्य दिले. पुरातत्वशास्त्रज्ञ डायने चेस आणि अर्लेन चेस यांनी 40 वर्षांपूर्वी येथे खोदकामास सुरूवात केली होती. त्यानंतर पहिल्यांदाच या ठिकाणी कॅरकोलमध्ये शाही थडगे मिळाले. कआब चाक हा कॅरकोलच्या सिंहासनावर इसवी सन 331 मध्ये आला होता. हे शाही थडगे जवळपास 350 इसवी सनातील मानण्यात येत आहे. या थडग्यात मातीची भांडी, कोरलेली हाडे, सीशेल, नळीच्या आकाराचे जाड मोती आणि जेडपासून तयार मोजेक डेथ मास्क आढळला.
अचानक लुप्त झाले हे शहर
एका पात्रात माया शासक भाला धरलेला आहे. तर दुसर्या पात्रात एक व्यापारी देवता, ज्याचे नाव ‘एक चुआह’ असे आहे तो दिसत आहे. कॅराकोल हे शहर सहाव्या आणि सातव्या शतकात माया संस्कृतीचे प्रमुख केंद्र होते. या शहरात 100,000 पेक्षा अधिक लोकांची घरं होती. पण 900 इसवीमध्ये इतर माया शहरांप्रमाणए ते रहस्यमयपणे अधोगतीला गेले. त्याचे अवशेष आज बेलीझच्या कायो जिल्ह्यातील पर्वतीय जंगलात आढळतात.
40 वर्षांपासून संशोधक या भागात उत्खनन करत आहेत. चेस बंधूंनी 40 वर्षांपूर्वी येथे खोदकामास सुरूवात केली होती. त्यानंतर पहिल्यांदाच या ठिकाणी कॅरकोलमध्ये शाही थडगे मिळाले. कआब चाक या त्यावेळी येथील राजा होता. त्याचे शाही थडगे संशोधकांच्या हाती लागले आहे. हा एक महत्वाचा पुरावा मानण्यात येत आहे. त्यामुळे इतिहासातील मधली कडी जुळवण्यात संशोधकांना सोपे जाईल. या थडग्यात मातीची भांडी, कोरलेली हाडे, सीशेल, नळीच्या आकाराचे जाड मोती आणि जेडपासून तयार मोजेक डेथ मास्क आढळला.
