AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जेव्हा Ajay Devgnला राग येतो..! Video Share करत Anand Mahindra म्हणाले, बहुतेक शहर सोडून जावं लागेल..!

उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) सोशल मीडियावर (Social Media) सक्रिय असतात. त्यांनी एक व्हिडिओ शेअर केलाय, ज्यात अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn)वारंवार स्क्रिप्ट बदलल्यामुळे अस्वस्थ दिसत आहे. व्हिडिओ महिंद्रा बस, ट्रकच्या जाहिरातीदरम्यानचा आहे.

जेव्हा Ajay Devgnला राग येतो..! Video Share करत Anand Mahindra म्हणाले, बहुतेक शहर सोडून जावं लागेल..!
जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान अजय देवगण
| Updated on: Feb 14, 2022 | 7:58 PM
Share

Mahindra Bus and Truck : प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) सोशल मीडियावर (Social Media) खूप सक्रिय असतात. तो जेव्हाही ट्विटरवर एखादी पोस्ट शेअर करतात तेव्हा ती लगेच व्हायरल होते. सध्या त्यांच्या एका ट्विटची खूप चर्चा होत आहे. यावेळी त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn)वारंवार स्क्रिप्ट बदलल्यामुळे खूप अस्वस्थ दिसत आहे. हा व्हिडिओ महिंद्रा बस आणि ट्रकच्या जाहिरातीदरम्यानचा आहे. उद्योगपती महिंद्रांनीही ट्विटमध्ये लिहिले आहे, की आता मला शहर सोडून पळून जावे लागेल, असे वाटते. आनंद महिंद्रा यांनी काही तासांपूर्वी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर ही 11 सेकंदांची व्हिडिओ क्लिप शेअर केली होती. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, की मला सांगण्यात आले आहे, की महिंद्रा ट्रक आणि बसच्या जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान अजय देवगणचा संयम सुटला आहे. तो आमच्या कोणत्याही ट्रकने माझ्यामागे येण्यापूर्वी, मी हे शहर सोडलेले बरे. प्रॉडक्शन युनिट वारंवार स्क्रिप्ट बदलत असल्याने तो नाराज आहे.

अजय देवगणला येतो राग

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की अजय देवगण युनिटला सांगत आहे, की तुम्ही स्क्रिप्ट का वारंवार बदलत आहात? यावर त्यांना वारंवार नाही, फक्त चार वेळा असे उत्तर दिले जाते. यानंतर अजय देवगणला राग येतो. उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्या या पोस्टला 2800हून अधिक लोकांनी लाइक केले आहे, तर 200हून अधिक लोकांनी ते रिट्विट केले आहे. त्याचवेळी, व्हिडिओला 73 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. ही संख्या सातत्याने वाढत आहे. त्याचवेळी त्यांचे चाहतेही मजेशीर कमेंट करत आहेत.

घाबरलेल्या इमोजीला केले रिट्विट

एक यूझर म्हणतो, की सर, तुम्हाला अजय देवगणच्या स्टंटबद्दल माहिती नसेल. तो त्याच्या चित्रपटांप्रमाणे दोन ट्रकवर येणार आहे. गंमत म्हणजे आनंद महिंद्रा यांनीही यावर प्रतिक्रिया देत घाबरलेल्या इमोजीला रिट्विट केले आहे. अजय देवगण महिंद्रा ट्रक आणि बसचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. काही महिन्यांपूर्वी, तो त्याच्या आयकॉनिक स्टंटची पुनरावृत्ती करताना दिसला होता.

आणखी वाचा : 

अभिनय असावा तर असा! पठ्ठ्या गाडीवर चढून लावतोय जोर, Funny video viral

जवानांनी स्वीकारलंय Online गाण्याचं चॅलेंज, पाहा कोण कसं गातंय? Viral Video पाहुन हसू येईल…

महिने किंवा वर्षे नाही, तर काही मिनिटांत उभारा तुमचं घर; कसं? पाहा ‘हा’ Viral Video

त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.