Incredible India : ‘इथे’ एक कप चहा पिणंदेखील स्वर्गसुख, Anand Mahindra यांनी शेअर केला अप्रतिम Photo

Hindustan ki Antim Dukan : चमोली हा उत्तराखंड राज्यातील जिल्हा आहे. हा जिल्हा चीनच्या सीमेवर आहे. या जिल्ह्यातील एका गावात भारता(India)तील शेवटचे दुकान (India's last shop) आहे. आता याचसंबंधीचे ट्विट उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra)यांनी केले आहे.

Incredible India : 'इथे' एक कप चहा पिणंदेखील स्वर्गसुख, Anand Mahindra यांनी शेअर केला अप्रतिम Photo
भारतातील शेवटचे दुकान
Follow us
| Updated on: Feb 10, 2022 | 12:58 PM

Hindustan ki Antim Dukan : चमोली हा उत्तराखंड राज्यातील जिल्हा आहे. हा जिल्हा चीनच्या सीमेवर आहे. चीनच्या सीमेला लागून असलेल्या या जिल्ह्यात एक गाव आहे. ज्याचें नाव माणा आहे. या गावात भारतातील शेवटचे दुकान आहे. हा एक प्रसिद्ध सेल्फी पॉइंट आहे. या दुकानाला भेट देणारा पर्यटक त्याच्यासोबत सेल्फी घ्यायला विसरत नाही. असे मानले जाते, की या दुकानानंतर स्वर्गात जाण्याचा मार्ग आहे. येथील लोक मानतात, की माणा गावाचा महाभारताशी विशेष संबंध आहे. या गावाचे जुने नाव मणिभद्रपुरम होते. या ठिकाणाहून पांडव थेट स्वर्गात गेले. या गावाच्या मुख्य रस्त्यावर एक फलकही लावण्यात आला आहे. माणा गाव हे भारताच्या सीमेवरील शेवटचे गाव असल्याचे या फलकावर लिहिले आहे. भारता(India)तील शेवटचे दुकान (India’s last shop) याच गावात आहे. आता याचसंबंधीचे ट्विट उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी केले आहे.

चहासह मॅगीही

25 वर्षांपूर्वी चंदर सिंह बारवाल नावाच्या व्यक्तीने हे दुकान उघडले होते. तेव्हापासून हे दुकान देशभर प्रसिद्ध झाले आहे. उत्तराखंडमध्ये फिरायला येणारे लोक सर्वात आधी या गावात येतात, या दुकानात येतात आणि इथे सेल्फी घेतात. यानंतर दुकानात मिळणारा चहाचा आस्वाद नक्की घेतात. येथे अतिशय चविष्ट मॅगी मिळते, जे पर्यटक कधीही विसरत नाहीत.

फोटो ट्विट

आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून या गावाचा फोटो शेअर केला आहे. या दुकानाजवळ उभे राहून चहा घेण्याची आणि सेल्फी घेण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. दुकानाचा फोटो पोस्ट करत आनंद महिंद्रा यांनी लोकांना विचारले, ‘हे देशातील सर्वोत्तम सेल्फी स्पॉट्सपैकी एक नाही का?’ आनंद महिंद्रा यांनी दुकानाच्या नावाचे कौतुक केले आणि लिहिले, की या ठिकाणी एक कप चहा पिणेदेखील अनमोल असेल.

आणखी वाचा : 

Ranveer Singhनं शेअर केला ‘Chhoti Deepika’चा Video, हावभाव पाहुन तुम्हीही कराल कौतुक

पेरू खाण्याचं ‘हे’ अजब चॅलेंज स्वीकारणार का? पाहा ‘हा’ Viral झालेला Funny Video

Viral : कोट्यवधी रुपयांच्या बुगाडीवर अब्जावधीची सर्जनशीलता भारी! अफलातून Creativityचा ‘हा’ Video पाहाच

Non Stop LIVE Update
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.