VIDEO | केस कापताना चिमुकल्याने फोडला हंबरडा, नंतर एका मिनिटात शांत, लोकांनी काय केलं एकदा पाहाच !

छोटी मुलं एकदा रडायला लागली की त्यांना थांबवणं मुश्कील होऊन बसतं. सध्या अशाच एका रडणाऱ्या मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुलाला शांत करण्यासाठी जवळपास पाच ते सहा माणसांना मोठी मेहनत घ्यावी लागली.

VIDEO | केस कापताना चिमुकल्याने फोडला हंबरडा, नंतर एका मिनिटात शांत, लोकांनी काय केलं एकदा पाहाच !
boy crying

मुंबई : छोटी मुलं कधी काय करतील याचा नेम नाही. लहान मुलांच्या सवयी, त्यांना आवडणाऱ्या गोष्टी फार वेगळ्या असतात. कदाचित यामुळेच त्यांना सांभाळणे म्हणजे छोटे काम नाही, असे सर्रास म्हटले जाते . हीच छोटी मुलं एकदा रडायला लागली की त्यांना थांबवणं कठीण होऊन बसतं. सध्या अशाच एका रडणाऱ्या मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुलाला शांत करण्यासाठी जवळपास पाच ते सहा माणसांना मोठी मेहनत घ्यावी लागली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (boy crying while hair cutting barber singing song funny video went viral on social media)

केस कापताना मुलगा जोरात रडायला लागला

व्हायरल होत असलेला व्हिडीओ एका केशकर्तनालयातील असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओमध्ये एक बार्बर छोट्या मुलाचे केस कापत आहे. केस कापताना तो मुलाला खेळवतसुद्धा आहे. मात्र, मध्येच मोठा घोळ झाला आहे. बार्बर केस कापत असताना मुलगा अचानकपणे रडायला लागला आहे. या छोट्या मुलाचे रडणे पाहून सगळेच अवाक् झाले आहेत. त्याला शांत करण्यासाठी काय करावे हे कोणालाही समजत नाहीये.

मुलाला शांत करण्यासाठी सगळे गाणं गायला लागले

त्यानंतर केशकर्तनालयातील एका माणसाला  एक युक्ती सूचली आहे. त्याने जोरात गाणे गायला सुरुवात केली आहे. गाणे गात असताना तो मजेदार हावभावदेखील करत आहे. त्यानंतर बाकीच्या मुलांनीही छोट्या मुलासमोर गाण गायला सुरु केलं आहे. माझ्यासाठी सगळेच गाणं गात असल्याचे पाहून हा छोटा मुलगा शांत झाला आहे. माणसं करत असलेले हावभाव पाहण्यात छोटा मुलगा मग्न झाल्याचं दिसतंय. तर दुसरीकडे मुलगा मग्न झाल्याचे समजताच बार्बर मोठ्या शिताफीने लहान मुलाचे केस कापत आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे. नेटकही हा व्हिडीओ पाहून हसत आहेत. तसेच वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र त्याला मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहे. तसेच लाईकही केले जात आहे.

इतर बातम्या :

VIDEO : पिझ्झा पाहून बाळाने दिली लाखमोलाची Reaction, व्हिडीओ पाहून नेटकरीही खुश

अवघ्या 17 महिन्यात 3 कोटींचं कर्ज फेडलं, महिलेनं सांगितली पैसे बचतीची ‘आयडियाची कल्पना’!

Video | डोळे मिटलेले, चेहऱ्यावर हसू, गाणं ऐकणारा गोड चिमुकला एकदा पाहाच !

(boy crying while hair cutting barber singing song funny video went viral on social media)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI