AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: “जब कोई बात बिगड जाए” म्हणत विद्यार्थ्याकडून कॉलेजची फी भरण्यासाठी आर्थिक मदतीची मागणी, तरुणाच्या गाण्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल

सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत एक मुलगा रस्त्याच्या कडेला उभं राहुन गाणं म्हणत आहे, सोबत तो गिटारही वाजवत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला हा मुलगा "जब कोई बात बिगड जाए" हे गाणं गाताना दिसतो.

Video: जब कोई बात बिगड जाए म्हणत विद्यार्थ्याकडून कॉलेजची फी भरण्यासाठी आर्थिक मदतीची मागणी, तरुणाच्या गाण्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल
हा मुलगा खरंच एका म्युझिकल कॉलेजमध्ये शिकत आहे, पण त्याच्याकडे कॉलेजची फी भरण्यासाठी पैसे नाहित
| Edited By: | Updated on: Oct 13, 2021 | 6:53 PM
Share

जगातील प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही प्रतिभा असते. फक्त जर गरज असते ती ओळखण्याची आणि ती अधिकाधिक चांगली बनवण्याची. पण बहुतेक कलाकारांचे आयुष्य केवळ अपयशातच जातं. गरीबी त्यांच्या नशिबी येते. अशा परिस्थितीत, अनेक प्रतिभावान लोकांना त्यांच्या योग्यता असूनही काम मिळत नाही. एकीकडे अशी परिस्थिती असताना, काही लोक काम नसतानाही ती प्रतीभा जोपासण्याचं काम करतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो अशाच एका कलाकाराबद्दल सांगतो. ( Boy sings jab koi baat on street to pay his music school fees video goes viral)

सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत एक मुलगा रस्त्याच्या कडेला उभं राहुन गाणं म्हणत आहे, सोबत तो गिटारही वाजवत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला हा मुलगा “जब कोई बात बिगड जाए” हे गाणं गाताना दिसतो. मग हळू हळू व्हिडिओ जसजसा पुढे सरकतो, तेंव्हा कळतं की हा मुलगा खरंच एका म्युझिकल कॉलेजमध्ये शिकत आहे आणि त्याला फी भरण्यासाठी रस्त्यावर उभं राहुन आपल्या गाण्याचं प्रदर्शन करावं लागतं आहे, आणि त्याद्वारे तो पुढं शिकण्यासाठी लोकांकडे आर्थिक मदतीची मागणी करत आहे.

व्हिडीओ पाहा:

बाजूला उभे असलेले लोक मुलाचे गाणे ऐकून खूप आनंद घेतात. शिवाय या मुलाला शिकण्यासाठी प्रोत्साहितही करत आहेत. व्हिडिओमध्ये हे स्पष्ट दिसत आहे की काही लोक डिजिटल पेमेंटद्वारे त्याच्या खात्यात काही पैसे पाठवत आहेत, जेणेकरून हा मुलगा त्यांची फी भरू शकेल. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच हे प्रकरण व्हायरल झाले. त्यामुळे आता अनेकांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. अगदी बॉलिवूड स्टार्स सुद्धा मुलाच्या प्रतीभेच्या प्रेमात पडले.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर हृतिक रोशन आणि कुणाल कपूर यांनी मुलाचं खूप कौतुक केलं. हा व्हिडिओ अंकित टुडे नावाच्या अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. शिवाय इतरही सोशल मीडियावर अकाऊंटवर हा व्हिडीओ पाहायला मिळतो आहे. बातमी लिहिली जाईपर्यंत या व्हिडीओला 58 हजारांहून अधिक लोकांनी पाहिलं होतं. हा व्हिडीओ 9 ऑक्टोबर रोजी पोस्ट करण्यात आला. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. हेच कारण आहे की आता हा व्हिडीओ इंटरनेटच्या दुनियेत खूप धुमाकूळ घालत आहे.

हेही पाहा:

Video: 15 सेकंदात मुलीची वेणी घातली, सुपरडॅडचं नेटकऱ्यांकडून कौतुक, नेटकरी म्हणाले, ही आयडिया चांगली आहे!

Video: पाठीवर झाडाची पानं बांधली, आणि उंच झेप घेतली, चिमुरड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

 

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.