Video | आजीबाईचा नातवासोबत धडाकेबाज डान्स, मजेदार व्हिडीओ काही क्षणात व्हायरल

सध्या अशाच एका मजेदार डान्सचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा डान्स अगदीच विशेष आहे. कारण या व्हिडीओमध्ये एक तरुण आपल्या आजीसोबत थिरकताना दिसतोय. लोक या व्हिडीओ मोठ्या प्रमाणात लाईक करत आहेत.

Video | आजीबाईचा नातवासोबत धडाकेबाज डान्स, मजेदार व्हिडीओ काही क्षणात व्हायरल
dadai dancing with grandson

मुंबई : आपला आनंद साजरा करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे डान्स. आनंद झाला की लोक आजकाल ‘दिल खोलके’ डान्स करतात. नंतर याच डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. आपल्या आजूबजूला असेही काही लोक असतात ज्यांना डान्स करणे आवडते. वेळ मिळेल तिथे ते नाचायला लागतात. सध्या अशाच एका मजेदार डान्सचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण आपल्या आजीसोबत थिरकताना दिसतोय. लोक या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात लाईक करत आहेत. (dadi dancing with grandson video went viral on social media)

तरुण आपल्या आजीसोबत मजेदार डान्स करतोय

सोशल मीडियावर चर्चेत आलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्हाला एक आजी आणि तरुण नातू दिसेल. व्हिडीओमध्ये दिसणारा मुलगा हा आजीबाईंचा नातू आहे. या व्हिडीओमध्ये तरुण आपल्या आजीसोबत मजेदार डान्स करतोय. कशाचाही विचार न करता हा तरुण दिलखुलासपणे नाचतोय. विशेष म्हणजे व्हिडीओतील आजीसुद्धा आपल्या नातवासोबत आकर्षक डान्स करतेय.

तरुण आजीभोवती गोल-गोल फिरत आहे

व्हिडीओमध्ये तरुण आजीभोवती गोल-गोल फिरत हातवारे करत आहे. तर कधी गळ्यात असलेल्या टायच्या आधारे व्हिडीओतील तरुण वेगवेगळ्या अॅक्शन करतोय. हा सर्व मजेदार डान्स कॅमेऱ्यात कैद करण्यात आलाय.

पाहा व्हिडीओ

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ नेटकऱ्यांना चांगलाच आवडला आहे. लोक व्हिडीओला पाहून मजेदार कमेंट्स करत आहेत. तसेच त्याला आपल्या पर्सनल अकाऊंटला या व्हिडीओला शेअर करत आहेत. व्हायरल होणारा हा व्हिडीओ अंकित जंगिड नावाच्या तरुणाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. बघता बघता या छोट्या व्हिडीओला आतापर्यंत दहा हजार लोकांनी लाईक केले आहे.

इतर बातम्या :

‘पोलिसांनी मला सोडण्यासाठी 10 हजार घेतले, मारहाण करणारी तरुणी पोलिसांची खबरी’, कॅब ड्रायव्हरचा गंभीर आरोप

Video | नवरदेवाने नवरीला अचानकपणे उचललं, भर मंडपात हशा पिकला, व्हिडीओ एकदा पाहाच

Video | कशाचाही विचार न करता चिमुकला रस्त्यावर आला, भरधाव वेगात कार आली अन्…

(dadi dancing with grandson video went viral on social media)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI