AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रायव्हेट जेटमधून प्रवासात श्रीमंत लोक एअर होस्टेसकडे अशी काय डिमांड करतात ? हे ऐकून…

अनेक सेलिब्रिटी हेसुद्धा प्रायव्हेट जेटमधून, विमानांमधून, प्रवास करतानाचे, तिथेल्या आलिशान आयुष्याचे फोटो पोस्ट करत असतात, ते पाहून आपल्याला तिथली एक झलक दिसत असते. ते पाहून अनेकांना हा प्रवास करण्याची इच्छा होते. आयुष्यात एकदातरी प्रायव्हेट जेटमध्ये बसून आरामदायी प्रवास करावा, असं अनेकांचं स्वप्न असतं.

प्रायव्हेट जेटमधून प्रवासात श्रीमंत लोक एअर होस्टेसकडे अशी काय डिमांड करतात ? हे ऐकून...
| Updated on: Aug 01, 2025 | 3:41 PM
Share

आपल्या मालकीच्या किंवा खाजगी जेटमधून जगभर प्रवास करणे हे निश्चितच ग्लॅमरस वाटतं. पण याच विमानातून प्रवास करणाऱ्या, तेथे काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांसाठी, हा निश्चितच एक विचित्र अनुभव असू शकतो. इकॉनॉमी क्लासमध्ये मधल्या सीटवर बसून, लांब पल्ल्याच्या विमान प्रवासासाठी पैसे वाचवून तिकीट मिळवून, तुम्ही कदाचित स्वतःचे खाजगी जेट भाड्याने घेण्याचे स्वप्न पाहत असाल. अनेक सेलिब्रिटी हेसुद्धा प्रायव्हेट जेटमधून, विमानांमधून, प्रवास करतानाचे, तिथेल्या आलिशान आयुष्याचे फोटो पोस्ट करत असतात, ते पाहून आपल्याला तिथली एक झलक दिसत असते. ते पाहून अनेकांना हा प्रवास करण्याची इच्छा होते. आयुष्यात एकदातरी प्रायव्हेट जेटमध्ये बसून आरामदायी प्रवास करावा, असं अनेकांचं स्वप्न असतं.

पण याच विमानात काम करणाऱ्या लोकांकडून, एअर होस्टेसकडून तेथील प्रवाशांचा अनुभव जाणून घेतला तर चित्र काही वेगळंच दिसतं. खाजगी विमानांनी नियमितपणे प्रवास करणाऱ्या काही लोकांचा वेळ नेहमीच चांगला जात नाही. खाजगी विमानांमध्ये काम करतानाचे काही अनुभव हे फ्लाइट अटेंडंट्सनी सांगितले असून, खूप श्रीमंत आणि प्रसिद्ध लोकांसाठी जेवण बनवताना त्यांना काही विचित्र आणि अनेकदा अविश्वसनीय वागणं सहन करावं लागल्यांचही त्यांनी कबूल केलंय.

प्रायव्हेट जेटमधये कसे असतात अनुभव ?

एका फ्लाईट अटेंडंटने एका मॅगझिनशी बोलताना आपले अनुभव सांगितले, मात्र ती तिचं नाव उघड करू इच्छित नव्हती. ती प्रायव्हेट जेटमध्ये काम करत असताना तिला आलेला विचित्र अनुभव तिने कथन केला. त्या फ्लाईटमध्ये एक श्रीमंत रशियन प्रवासी होता जो विमानातच कपडे उतरवत असे आणि तो पूर्णपणे नग्न असताना त्याच्यासाठी अन्न आणि ड्रिंक्स आणण्यास भाग पाडत असे, असा भयानक किस्सा त्या  अटेंडंटने सांगितला. .

मात्र त्या श्रीमंत आणि शक्तिशाली प्रवाशाशी थेट सामना न करता,त्याचं हे विचित्र वागणं हाताळण्यासाठी तिच्याकडे एक चांगली युक्ती होती. “या रशियन माणसासोबत कोणीही (अटेंडंटने) एक किंवा दोनपेक्षा जास्त वेळा विमान प्रवास केला नाही,” असं तिने स्पष्ट केलं. “तो इतका असह्य होता. तरीही आश्चर्य म्हणजे मी एक महिनाभर टिकून राहिले. विमानात पाऊल ठेवल्यापासून तो अधिकाधिक मद्यधुंद होत असे आणि कधीकधी त्याचे सर्व कपडेही निघून जात असत, असा विचित्र अनुभव तिने सांगितला.

काय केली युक्ती ?

त्याने कपडे काढल्यावर, मी विमानातलं तापमान खूप थंड ठेवायचे, जेणेकरून तो अस्वस्थ होईल, आणि कदाचित कपडे वगैरे घालेल. विमान प्रवासात असताना मी त्याचं त्रासदायक वागणं कमी व्हावं म्हणून शांतपणे युक्ती करायचे, असंही तिने नमूद केलं.

तर दुसऱ्या एका अटेंडंटनेदेखील बयानक अनुभव सांगितला. प्रायव्हेट जेटमधील विमानांमधील प्रवाशांना अतिशय पर्सनल, अनुभवाची अपेक्षा असते. विविध खाजगी विमानांमधून जगभर प्रवास केल्यानंतर,ही अटेंडंट तिच्या पाहुण्यांच्या गरजा ओळखायला शिकली होती. एवढंच नव्हे तर तिने तर त्या प्रवाशांच्या पाळीव प्राण्यांची काळजी घेण्याचे कामही केले. आणि पार्ट्यांनंतर प्रवासी हे नियंत्रणाबाहेर जाऊन वाट्टेल तसे वागू नयेत याचीही तिने काळजी घेतली, असं सांगितलं. असे अनेक वचित्र अनुभव फ्लाईट अटेंडंट्सनी नमूद केलेत.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.