Video | रस्त्यावर, पुलावर पाणीच पाणी, बसचे झाले जहाज, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

पावसाची काय स्थिती आहे, हे सांगणारा असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये रस्त्यावर चालणारी बस चक्क जहाजासारखी पाण्यात तरंगत आहे.

Video | रस्त्यावर, पुलावर पाणीच पाणी, बसचे झाले जहाज, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
BUS LIKE SHIP

मुंबई : महाराष्ट्रात जवळपास सगळीकडेच पावसाने हजेरी लावली आहे. औरंगाबादसारख्या जिल्ह्यात तर दरड कोसळण्याची घटना घडली आहे. सध्या फक्त महाराष्ट्रच नाही तर देशातील अनेक भागात जोरदार पाऊस बरसतोय. मुसळधार पावसामुळे अनेकांची धांदल उडाली आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून त्याची भीषणता दाखवणारे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. दिल्लीमध्ये पावसाची काय स्थिती आहे, हे सांगणारा असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये रस्त्यावर चालणारी बस चक्क जहाजासारखी पाण्यात तरंगत आहे. (delhi facing heavy rainfall but became sunmarine video went viral on social media)

बहुतांश रस्त्यांवर पाणी साचले

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा दिल्लीमधील महिपालपूर परिसरातील आहे. सध्या दिल्लीमध्ये सगळीकडे पाऊस बरसत आहे. यामुळे येतील बहुतांश रस्त्यांवर पाणी साचले आहे. रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहनांना ये-जा करण्यासाठी मोठा त्रास होतोय. पाण्यामुळे एका मोठ्या बसची कशी परिस्थिती झालीय, हे या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले आहे.

बस एका जहाजासारखी वाटत आहे

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक हिरव्या रंगाची बस रस्त्यावरून जात आहे. रस्त्यावरुन जाताना अर्धी बस पाण्याखाली गेली आहे. बसचे चाक तर दिसतही नाहीयेत. अशा पावसात बस पुढे जातेय. रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे लोकांनी जमेत तिथे आपली वाहने उभी केली आहेत. बस वेगात आल्यामुळे तिचे चाक दिसत नाहीयेत. रस्त्यावरील पाणी हे समुद्रासारखे दिसत असून बस समुद्रातील जहाज असल्यासारखे वाटत आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओला उत्स्फूर्तपणे शेअर केले जातेय

बस वेगात पुढे गेल्यामुळे रस्त्यावर लाटा निर्माण झालायत. लाटांमुळे बाजूला उभ्या असलेल्या कार पूर्णपणे हलल्या आहेत. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लोक हा व्हिडीओ पाहून मजेदार कमेंट्स करत आहेत. तसेच या व्हिडीओला उत्स्फूर्तपणे शेअर केले जात आहे.

इतर बातम्या :

Video | परफेक्ट टायमिंग, परफेक्ट स्टंट, महिलेचा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल ‘तुस्सी बडे ग्रेट हो’

VIDEO : आज हम लोग मस्ती करेगाssss, दहीहंडीतील गंमती जमती, तुफान हसवणारा व्हिडीओ

Video | भर रस्त्यात राग अनावर, म्हाताऱ्या आजोबांचा तुफान राडा, व्हिडीओ व्हायरल

(delhi facing heavy rainfall but became sunmarine video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI