Devar Bhabhi Viral Video | वहिनीशी पंगा घेणं दीराला नडलं, वहिनीचं कृत्य बघून पाहुणे आश्चर्यचकित

लग्नाशी संबंधित अनेक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले जाता. यातील काही हास्यास्पद असतात, तर काही पाहून आश्चर्य वाटते. अशी अनेक माणसे आहेत, ज्यांना बघून असे कधी घडेल असा विचारही डोक्यात येत नाही. सध्या सोशल मीडियावर या लग्नसोहळ्याचा असाच एक व्हिडीओ समोर येत आहे. यामध्ये नवविवाहित नवरीने दीरासोबत सर्वांसमोर अशी मस्ती केली, जी पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल की वहिणीशी पंगा घेणं महागात पडलं.

Devar Bhabhi Viral Video | वहिनीशी पंगा घेणं दीराला नडलं, वहिनीचं कृत्य बघून पाहुणे आश्चर्यचकित
Viral wedding video

मुंबई : लग्नाशी संबंधित अनेक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले जाता. यातील काही हास्यास्पद असतात, तर काही पाहून आश्चर्य वाटते. अशी अनेक माणसे आहेत, ज्यांना बघून असे कधी घडेल असा विचारही डोक्यात येत नाही. सध्या सोशल मीडियावर या लग्नसोहळ्याचा असाच एक व्हिडीओ समोर येत आहे. यामध्ये नवविवाहित नवरीने दीरासोबत सर्वांसमोर अशी मस्ती केली, जी पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल की वहिनीशी पंगा घेणं महागात पडलं.

लग्नाचा सीझन सुरु होणार आहे. अशा परिस्थितीत सोशल मीडियावर त्याच्याशी संबंधित मजेदार व्हिडीओही शेअर होऊ लागले आहेत. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये नवीन नवरी स्टेजवर जाते, पण तिला बसायला जागा मिळत नाही. खरं तर, वराचे मित्र त्यांच्या भावी वहिनीची चेष्टा करायला मुद्दाम तिथेच बसतात. मात्र, यानंतर वधूने जे काही केले ते पाहून उपस्थित सर्वच आवाक झाले. वधूला जागा मिळत नसल्याने ती थेट वराच्या कुशीत जाऊन बसते. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू येईल.

पाहा व्हिडीओ –

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लक्षात येते की, या दीराला वहिनीचे हे उत्तर आता आयुष्यभर लक्षात राहील. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वराचा मित्र खुर्चीवरुन उठत नाही, तेव्हा वधू हसत-हसत वराकडे जाते आणि त्याच्या कुशीत बसते. यादरम्यान, वराची प्रतिक्रियाही पाहण्यासारखी आहे. अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे वराला आश्चर्याचा धक्का बसल्याचं तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता.

हा अतिशय मजेशीर व्हिडीओ इंस्टाग्रामवर Trending Wedding Couples नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओसोबत एक मजेदार कॅप्शन देण्यात आले आहे, ‘दीर… आता वहिनीशी कधीही पंगा घेऊ नको.’ 7 नोव्हेंबरला शेअर केलेल्या या व्हिडीओला आतापर्यंत 22 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. लोकांना हा व्हिडीओ खूप आवडला आहे. यावर लोक जोरदार कमेंट करत आहेत.

एका यूजरने कमेंट करताना लिहिले, गर्ल पॉवर. त्याचवेळी आणखी एका यूजरने कमेंट करताना लिहिले आहे की, माझ्या वहिनीने भावाला आपल्या मांडीवर बसवले होते. आणखी एका यूजरने कमेंट करत लिहिले की, ‘भाभी रॉक्स देवर शॉक्ड.’ एकूणच दीर-वहिनी यांच्यातील हा फनी व्हिडीओ लोकांना खूप आवडला आहे.

संबंधित बातम्या :

Viral Video | मंदिरात चोरी करण्यापूर्वी चोराने घेतला देवाचा आशीर्वाद, व्हिडीओ व्हायरल

Nora Fatehi Viral Video | ‘कुसू कुसू’ गाण्यावर गायिकेसह थिरकली नोरा फतेही, बेली डान्सचा व्हिडीओ व्हायरल

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI