ताईंनी सांगितली 5 ते 10 मिनिटांत मेथीची भाजी निवडण्याची भन्नाट ट्रीक; VIDEO पाहून थक्क व्हाल
सोशल मीडियावर कधी काय व्हायरलल होईल काही साांगता यायचं नाही. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात एका महिलेनं झटपट मेथीची भाजी निवडण्याची अगदी सोपी पद्धत सांगितली आहे. सध्या या व्हिडीओची प्रचंड चर्चा होताना दिसत आहे.

सकाळी सकाळी डब्याची घाई असली आणि जर त्यात नेमकी कोणती भाजी निवडायची राहिली असेल तर मात्र चांगलीच फजिती होते. त्यात मेथीची भाजी असेल ती करायला फार सोपी ती निवमेडण्यामध्ये फार वेळ जातो. पण गृहिणींकडे काही ना काही किचन जुगाड असतातच. अशाच एका गृहीणीने एक भन्नाट किचन जुगाड सांगितला आहे.
मेथी निवडण्याचा भन्नाट जुगाड
ताईंचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये या गृहीणीने जो जुगाड सांगिला आहे तो पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. मेथी खाणे आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहे. पण ही भाजी निवडण्यासाठी बराच वेळ लागतो. पण या व्हिडीओच्या माध्यमातून मेथी निवडण्याची सोपी पद्धत तुम्हाला नक्की कळेल. पहिल्यांदा पाहिल्यावर तुम्हाला ही पद्धत थोडी विचित्र वाटू शकेल पण प्रत्यक्षात करून पाहिल्यावर लक्षात येईल.
कमी वेळात मेथीची भाजी निवडण्याची सोपी पद्धत व्हायरल
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक महिला आधी आपण जसं भाजी नेहमी निवडतो तशा पद्धतीने म्हणजे हाताने मेथीची पाने खुडून आपण भाजी निवडतो पण ती पद्धत योग्य नसल्याचं सांगत किंवा ही पद्धत अदीच वेळखाऊ असल्याचं सांगतं अगदी सोप्या पद्धतीने भाजा कशी निवडायची हे तिने व्हिडीओत पुढे सांगितलं आहे. ही महिला एक झारा घेते. त्यात मेथीच्या काड्या पटापट अडकवते आणि दुसऱ्या बाजूने ती देठं ओढते.
अशा पद्धतीने ती मेथी फार काही मेहनत न घेता पटकन निवडली जात असल्याचं दिसून येत आहे. जेवढा वेळ आपल्याला नेहमीप्रमाणे म्हणजे मेथीची पाने खुडण्यासाठी लागतो त्यापेक्षा तरी नक्कीच कमी वेळ लागेल.
View this post on Instagram
ताईंच्या व्हिडीओवर कमेंट्स अन् लाइक्स
ताईंचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्याच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सही केल्या आहेत. काहींना ही पद्धत रुचली आहे तर काहींना नाही. त्यामुळे तुम्ही या ताईंनी दाखवल्याप्रमाणे एकदा अशा पद्धतीने मेथीची भाजी निवडण्याचा प्रयत्न करून पाहा. म्हणजे किती वेळा लागतो याचाही अंदाज येईल.
पण निवडण्याआधी भाजी स्वच्छ धुवून घ्यायला विसरू नका. मेथीच्या पानांमध्ये भरपूर माती असते. म्हणजेच कुठल्याही पालेभाजी, फळभाजीत माती असते. त्यामुळे त्यांना अनेक वेळा स्वच्छ पाण्याने धुणे गरजेच आहे. त्यात मिठाच्या पाण्याने कोणतीही पालेभाजी धुणे उत्तम मानले जाते.
