ट्रांसफरमुळे इंजिनीअर झाला नाराज, केलं मोठं कांड! तीन दिवस अख्ख गाव…
एका इंजिनीअरची बदली करण्यात आली होती. या बदलीमुळे नाराज झालेल्या इंजिनीअरने मोठं कांड केलं. त्यामुळे संपूर्ण गावाला जवळपास तीन दिवस त्रास झाला होता. जेव्हा इंजिनीअरचे कांड समोर आले तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. चला जाणून घेऊया नेमकं काय झालं?

गुजरातमधील वडोदरा शहरातील नवायार्ड भागात एका इंजिनिअरने आपला राग गावकऱ्यांवर काढला आहे. 23 ऑगस्त रोजी नवायार्डमध्ये पाणीपुरवठा अचानक पूर्णपणे ठप्प झाला. तीन दिवस नळांना पाणी आलं नाही. नवायार्ड भागात पाण्याची समस्या नेहमीच असते. त्यामुळे लोकांना वाटलं की पाइपलाइन फुटली किंवा गळतीमुळे पाणी येत नसावं. पण जेव्हा पाणी न येण्याचं खरं कारण समोर आलं, तेव्हा सर्वजण चकित झाले.
खरं तर, वडोदरा महानगरपालिकेचे डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर योगेश वसावा यांनी पाण्याचा भूगर्भातील व्हॉल्व्ह बंद करायला लावला होता, ज्यामुळे पाणीपुरवठा खंडित झाला आणि लोकांना पाणी मिळालं नाही. यामुळे लोकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. अनेकांनी टँकर आणि हँडपंपांवरून पाणी भरलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे याबाबत इतर कोणत्याही अधिकाऱ्याला माहिती नव्हती. तेही पाण्याच्या समस्येचं निराकरण शोधण्यात गुंतले होते.
ट्रान्सफरमुळे इंजिनिअर योगेश नाराज
पण खरं म्हणजे हा प्रकार डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर योगेश वसावा यांच्या नाराजीशी जोडलेला होता. त्यांची पाणीपुरवठा विभागातून बदली करून रस्ते विभागाच्या हॉट मिक्स प्लांटमध्ये करण्यात आली होती. यामुळे योगेश नाराज होते आणि त्याचा सूड घेण्यासाठी त्यांनी पाणीपुरवठा बंद केला. म्हणजेच त्यांनी आपला राग जनतेवर काढला. योगेशचा हा राग जनतेसाठी संकट ठरला, ज्यांना तीन दिवस पाण्याच्या टंचाईला सामोरं जावं लागलं.
अशा प्रकारे झाला इंजिनिअरचा पर्दाफाश
हा प्रकार तेव्हा उघडकीस आला, जेव्हा त्या ठिकाणी खणकाम करण्यात आलं. खणकामातून समोर आलं की व्हॉल्व्ह मुद्दाम बंद करण्यात आला होता. आता प्रश्न होता की हे कोणी केलं? यासाठी परिसरातील सीसीटीवी फुटेज तपासले गेले. सीसीटीवीमध्ये कर्मचारी संजय माळी व्हॉल्व्ह बंद करताना दिसला. त्यानंतर संजयची चौकशी केली असता त्याने सर्व सत्य उघड केलं आणि सांगितलं की योगेशच्या सांगण्यावरून त्याने हे केलं. अशा प्रकारे योगेशची पोल उघड झाली.
दुसऱ्या इंजिनिअरने केली तक्रार दाखल
यानंतर डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर आलोक शाह यांनी योगेशविरुद्ध तक्रार दाखल केली. तक्रारीत त्यांनी सांगितलं की, योगेशने आपला राग आणि नाराजी काढण्यासाठी असं केलं. आलोक शाह यांनी तक्रार करताना योगेशवर आरोप केला की, त्यांनी त्यांना त्रास देण्यासाठी आणि लोकांमध्ये असंतोष निर्माण करण्याच्या उद्देशाने पाणीपुरवठा बंद करवला. या घटनेमुळे परिसरातील लोकांमध्येही संताप आहे. त्यांनी जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
