AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Extinct Tasmanian Tiger | 85 वर्षांपूर्वी लुप्त झालेला प्राणी पुन्हा दिसल्याचा दावा, अर्धा कुत्रा-अर्धा वाघ

आश्चर्याची बाब म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या तस्मानियात लोकांनी एक असा प्राणी बघितल्याचं सांगितलं आहे, जो तब्बल 85 वर्षांपूर्वी लुप्त झाला आहे (Extinct Tasmanian Tiger).

Extinct Tasmanian Tiger | 85 वर्षांपूर्वी लुप्त झालेला प्राणी पुन्हा दिसल्याचा दावा, अर्धा कुत्रा-अर्धा वाघ
Tasmanian tiger
| Updated on: Mar 23, 2021 | 9:23 AM
Share

मुंबई : जर कुठला प्राणी पृथ्वीवरुन लुप्त झाला असेल तर तो पुन्हा कसा दिसू शकतो? (Extinct Tasmanian Tiger) पण, आश्चर्याची बाब म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या तस्मानियात लोकांनी एक असा प्राणी बघितल्याचं सांगितलं आहे, जो तब्बल 85 वर्षांपूर्वी लुप्त झाला आहे. हा प्राणी अर्धा कुत्र्यासारखा तर अर्धा वाघासारखा दिसतो. या प्राण्याला तस्मानियन टायगर म्हटलं जातं (Extinct Tasmanian Tiger Declared Extinct Before 85 Years Ago Claimed To Spot Again).

8 दशकांपूर्वी लुप्त झालेल्या या प्राण्याला कुठे बघितलं गेलं?

तस्मानियन टायगर हा साधारणपणे ऑस्ट्रेलिया आणि पूर्ण तस्मानिया परिसरात आढळायचा. पण, 1936 मध्ये या प्राण्याला लुप्त घोषित करण्यात आलं होतं. ऑस्ट्रेलियाच्या थायलासीन अवेअरनेस ग्रूपचे अध्यक्ष नील व्हॉटर्सने खुलासा केला की त्यांनी तस्मानियन टायगरच्या एका कुटुंबाला जंगलात पाहिलं. यांच्याकडे पुरावे म्हणून फोटोही आहेत.

नील व्हॉटर्स यांनी सांगितलं की, त्यांच्याकडे असे चार फोटो आहेत ज्यामध्ये तस्मानियन टायगरचं पूर्ण कुटुंब आहे. यामध्ये काही बछडे देखील आहेत. या खुलास्यानंतर वन्याजीव प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पण, काही दिवसांनंतर नील व्हॉटर्स यांचे हे फोटो चुकीचे ठरले. त्यांना ओळखण्यात चुकी झाली आहे.

मनोवैज्ञानिक या प्रकारच्या गोष्टीला प्रसिद्धतेची प्रद्धत मानतात. याच प्रकारे 2005 मध्ये WWF च्या कॅमेऱ्यात एक रहस्यमयी मांसाहारी उडणाऱ्या खारेचं फुटेज कैद झालं होतं. हे फुटेज इंडोनेशियाच्या बॉर्नियोच्या जंगलात रिकॉर्ड झाले होते. 2007, 2011 आणि 2014 मध्ये टेक्सासमध्ये विना केसांचे कुत्रे आणि वानरांचे व्हिडीओही पुढे आले होते. यांना चुपाकाबरास म्हटलं गेलं.

दशकांपूर्वी लुप्त झालेला प्राणी पुन्हा दिसणे अशक्य

दशकांपूर्वी लुप्त झालेला कुठला प्राणी पुन्हा दिसणे अशक्य आहे. 1840 पासून गायब ब्लॅक-ब्रोड बॅबलर नावाचा प्राणी इंडोनेशियात दिसला होता. एका व्यक्तीने त्यांचे फोटोही घेतले होते. त्यानंतर तपासात ही माहिती पुढे आली की त्या प्रकारचे फक्त सहा प्राणी आहेत ज्यांना या व्यक्तीने पाहिलं होतं. तस्मानियन टायगरचे फोटोही उपलब्ध आहेत. व्हिडीओही आहेत. पण, ते पुन्हा दिसणे हे अशक्य आहे (Extinct Tasmanian Tiger Declared Extinct Before 85 Years Ago Claimed To Spot Again).

20 लाख वर्षांपूर्वीचा प्राणी

असं मानलं जातं की तस्मानियन टायगर हा 20 वर्षांपूर्वी पृथ्वीवर आला होता. पण, या प्रकारचा शेवटचा जिवंत प्राणी 1930 मध्ये तस्मानियात दिसला होता. त्यानंतर या प्राण्याला कोणीही पाहिलं नाही. काही लोक याला तस्मानियन लांडगाही म्हणतात. वयस्क तस्मानियन टायगर 39 ते 51 इंच लांब असतो. याचं वजन 12 ते 22 किलोग्राम असतं. यांची उंची 20 ते 26 इंच इतकी असते. यांच्या शरीराचा पुढील भाग कुत्र्यासारखा असतो तर मागील भागावर वाघासारखे पट्टे असतात.

तस्मानियन टायगर रात्री फिरणारा मांसाहारी प्राणी होता. हे झाडांमधील गड्ड्यांमध्ये, मोठे घरटे इत्यादीमध्ये आपला घर बनवतं. याला एक आक्रमक जीव मानलं जात होतं. याचा सर्वाधिक धोका हा शेती करणाऱ्या लोकांना होता. हे हल्ला केल्यानंतर लोकांना जखमी करुन शेती उध्वस्त करत होते.

Extinct Tasmanian Tiger Declared Extinct Before 85 Years Ago Claimed To Spot Again

संबंधित बातम्या :

या टॅक्सीचालकाने असं काय केलं, की रातोरात झाला प्रसिद्ध?, वाचा सविस्तर

#JanataCurfew | जनता कर्फ्यूची वर्षपूर्ती, सोशल मीडियावर मजेशीर व्हिडीओ, फोटो व्हायरल

रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?.
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका.