Video: ज्यावेळी तिनं पहिल्यांदा ट्रेन पाहिली, चिमुकलीचा आनंद तुम्हीचं पाहा

रेल्वे पाहून तिला होत असलेला आनंद तिच्या निरागस चेहऱ्यावर पाहायला मिळतो.

Video: ज्यावेळी तिनं पहिल्यांदा ट्रेन पाहिली, चिमुकलीचा आनंद तुम्हीचं पाहा
चिमुकली ट्रेनची वाट पाहताना

नवी दिल्ली: सोशल मीडियावर सतत काहीना काही व्हायरल होत असते. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये लहान मुलांसंबंधीचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळातात. सोशल मीडिया युजर्सकडून ते व्हिडीओ मोठ्या प्रमाणात लाईक आणि शेअर केले जातात. सध्या अशाच एका लहान मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संबंधित व्हिडीओतील मुलगी तिच्या आयुष्यात पहिल्यांदाचं रेल्वे पाहते. रेल्वे पाहून तिला होत असलेला आनंद तिच्या निरागस चेहऱ्यावर पाहायला मिळतो. या मुलीचा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हीदेखील आनंदी झाल्याशिवाय राहणार नाही. ( Girl saw first time railway his cute expressions video viral on social media)

व्हिडीओ

जेव्हा ती पहिल्यांदा रेल्वे पाहते

लहान मुलं किती निरागस असतात ते तुम्ही या व्हिडीओतून पाहू शकता. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहाल की एक लहान मुलगी ट्रेनची वाट पाहत आहे. जशी ट्रेन येते तशी ती आनंदी होते. तिच्या चेहऱ्यावरील आनंद आणि हावभाव पाहून तुम्ही देखील आनंदी व्हाल. हा व्हिडीओ बनवणारी व्यक्ती तिला विचारते की काय येत आहे? तर ती मोठ्या उत्साहात उत्तर देते ट्रेन येत आहे. जशजशी ती ट्रेन जवळ येत जाते तशी ती मुलगी थोडी थोडी भीतीपोटी प्लॅटफॉर्मवर बाजूला सरकते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लोक देखील या व्हिडीओवर चांगल्या कमेंट करत आहेत.

हा व्हिडीओ कुणी शेअर केला?

लहान मुलीचा हा व्हिडीओ @BrianRoemmele या ट्विटरवरील वापरकर्त्यानं शेअर केला आहे. त्यानं व्हिडीओसोबत ‘एका लहान मुलांच्या डोळ्यातून जग पाहणे, ज्यावेळी तिनं पहिल्यांदा ट्रेन पाहिली’, असं कॅप्शन लिहिलं आहे. सोशल मिडीयावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ 60 लाखांहून अधिक व्यक्तींनी पाहिला आहे.

संबंधित बातम्या :

Train Time Table | प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! ‘या’ रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक बदलले, प्रवासापूर्वी एकदा वेळा तपासा..

Video : ‘हाता तोंडाम्होरं घास परी गिळना, गेला जळून जळून जीवं प्रीत जुळना’; शालूच्या अदांनी चाहत्यांच्या काळजाचे पाणीपाणी

( Girl saw first time railway his cute expressions video viral on social media)

Published On - 6:44 pm, Fri, 2 April 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI