दादासाहेब कारंडे, प्रतिनिधी, मुंबई : हर्ष गोयंका (Harsh Goenka) यांना कोण ओळखत नाही. ते एक प्रसिद्ध उद्योगपती असून सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ते सोशल मीडियावर अनेकदा वेगवेगळ्या आणि मजेशीर पोस्ट आणि व्हिडिओ शेअर (Viral Video) करतात, ज्या वाचून लोक कधी शॉक होतात तर कधी खळखळून हसतात. त्यांची अशीच एक पोस्ट सध्या ट्विटरवर खूप व्हायरल होत आहे, जी खूप मनोरंजक आहे. हर्ष गोएंका हे खास मनोरंजक पोस्टसाठी देखील ओळखले जातात. खरंतर त्यांनी त्याच्या ट्विटर हँडलवर मजेदार पद्धतीने एक प्रश्न विचारला आहे, ज्याचे उत्तर देखील त्यांना तेवढेच धमाकेदार पद्धतीने मिळाले आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटरवर विचारले, ‘बॉन्डिंगसाठी कोणते चांगले आहे? फेविकॉल की अल्कोहोल?’ यावर फेविकॉल (Fevicol) कंपनीकडून मजेदार उत्तरही आले आहे, हे जाणून तुम्हीही नक्कीच म्हणाल याला बोलतात सौ सोनार की और एक लोहार की…