Poll fail! हर्ष गोयंकांनी शेअर केलं मजेशीर Meme, यूझर्सच्याही भन्नाट कमेंट्स

Election Results : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक आणि त्याचे निकाल याची सर्वच जण प्रतीक्षा करत होते. सोशल मीडियावर तर मीम्सचा वर्षाव सुरू आहे. उद्योगपती हर्ष गोयंका यांनीही एक मजेदार मीम शेअर केले आहे.

Poll fail! हर्ष गोयंकांनी शेअर केलं मजेशीर Meme, यूझर्सच्याही भन्नाट कमेंट्स
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर शेअर केले मीम
Image Credit source: Twitter
प्रदीप गरड

|

Mar 10, 2022 | 2:21 PM

Election Results : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक आणि त्याचे निकाल याची सर्वच जण प्रतीक्षा करत होते. आता भाजपाच्या बाजूने लोकांनी कल दिल्याचे स्पष्ट दिसत आहे. 403 जागांसाठी (UP Election Result 2022) पुन्हा एकदा कमळ फुलताना दिसत आहे. येथे भाजपाचे (BJP) वादळ आहे, तर काँग्रेस (Congress) आणि बसपा (BSP) यांच्यामध्ये खालून पहिल्या क्रमांकावर येण्याची स्पर्धा आहे. या परिस्थितीवर सोशल मीडियावर तर मीम्सचा वर्षाव सुरू आहे. भाजपा, काँग्रेस, सपा, बसपा हे प्रमुख पक्ष आणि त्यांच्याशी संबंधित मीम्स प्रचंड व्हायरल झाले आहेत. यादरम्यान प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयंका हेही मागे नाहीत. नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असणार गोयंका यांनीही एक मजेदार मीम शेअर केले आहे. ते पाहून यूझर्स हसल्याशिवाय राहत नाहीत.

सर्व पोल फेल!

उत्तर प्रदेश विधानसभा ही देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. त्या पार्श्वभूमीवर येथील निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ओपिनियन पोलवाले तर नजर ठेवून होते. उत्तर प्रदेशात विविध ओपिनियन पोलमध्ये भिन्नता होती. कोणी सपाला तर कोणी भाजपाला झुकते माप देत होते. एक्झिट पोलचेही तेच. निकाल मात्र काय लागला, हे सर्वांसमोर आहे. त्यालाच अनुसरून गोयंका यांनी एक मीम शेअर केले आहे. कॅटरिना कैफ हिच्याशी संबंधित हे मीम आहे. या फोटोमध्ये आधी सलमान खान मग रणबीर कपून आणि शेवटी विकी कौशल दाखवण्यात आला आहे. म्हणजेच ओपिनियन आणि एक्झिट पोल कसे फेल झाले तेही त्यांनी या फोटोतून दाखवले आहे.

ट्विटरवर शेअर

ट्विटरवर त्यांनी हा फोटो शेअर केला आहे. तो आता वेगाने व्हायरल होत आहे. लोक लाइकही करत आहेत. तसेच रिट्विटही जोशात होत आहे. कमेंटमध्ये यूझर्सनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. एकाने म्हटले आहे, ‘Really tremendous humour bomb’ तर आणखी एकाने म्हटले आहे, Excellent outcome… याशिवाय इतर अनेक यूझर्सनी या मीमला दाद दिली आहे. तर काहींनी ऐश्वर्या बच्चनचा फोटो रिट्विट केला आहे.

आणखी वाचा :

Viral : काय जबरदस्त साधलंय संतुलन! पुन्हा पुन्हा पाहावा असा Stunt video

Viral : हे अप्रतिम आहे! कोणतीही अत्याधुनिक साधनं नाहीत, तरीही तालासुरात गायन; ‘हा’ Video पाहाच

Viral video : रणरणत्या उन्हात तहानलेल्या सापाला तळहातात पाणी घेऊन पाजलं; पाहा, पुढे काय झालं?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें