AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral : हे अप्रतिम आहे! कोणतीही अत्याधुनिक साधनं नाहीत, तरीही तालासुरात गायन; ‘हा’ Video पाहाच

Bhajani Mandal : सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडिओ (Video) व्हायरल होत असतात. कधी एखाद्या गाण्याच ट्रेंड (Trend) असतो. मग त्यावर रील बनवल्या जातात. एक मंडळ सध्या व्हायरल (Viral) होत आहे. एका मराठी गीताचे गायन अमराठी मंडळाने गायले आहे.

Viral : हे अप्रतिम आहे! कोणतीही अत्याधुनिक साधनं नाहीत, तरीही तालासुरात गायन; 'हा' Video पाहाच
मराठी गीत गाताना चेन्नईचं भजनी मंडळImage Credit source: Twitter
| Updated on: Mar 10, 2022 | 12:23 PM
Share

Bhajani Mandal : सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडिओ (Video) व्हायरल होत असतात. कधी एखाद्या गाण्याच ट्रेंड (Trend) असतो. मग त्यावर रील बनवण्याची चढाओढ लागलेली असते. एखादे गाणे हीट झाले की त्यावर रील्स बनवल्या जातात. कधीकधी तर त्याचे भजनाचे व्हर्जनदेखील आपल्याला पाहायला मिळते. पण आपल्याकडे कोणतेही साधन नसताना फक्त आणि फक्त आवडच असेल तर? तरीही आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो. असेच एक भजनी मंडळ सध्या व्हायरल (Viral) होत आहे. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. आपल्याएवढ्या विविधतेचा देश जगाच्या पाठीवर शोधून सापडणार नाही. ही विविधता असूनही एकता आहे. हेच दर्शविणारा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. एका मराठी गीताचे गायन अमराठी मंडळाने गायले आहे, तेदेखील अत्यंत सुमधूर आवाजात. विश्वास बसणार नाही, मात्र व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला याची खात्री पटेल.

कानडा राजा पंढरीचा…

व्हिडिओमध्ये आपल्याला एक मंडळ दिसत आहे. यात काही महिला आणि पुरूष आहेत. समोर माइक नाही, रेकॉर्डिंगची अत्याधुनिक साधने नाहीत, स्टेज नाही, भलामोठा वाद्यांचा ताफा नाही, प्रकाशयोजना नाही, तरी सुमधूर! त्याहून अफाट म्हणजे चेन्नईतील हे भजनी मंडळ गदिमांनी लिहिलेले आणि सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेले मराठी भजन तालासुरात म्हणत आहेत! हे ऐकायला अत्यंत सुमधूर असून यूझर्संना या व्हिडिओने प्रभावित केले आहे. कानडा राजा पंढरीचा… हे गीत या मंडळाकडून ऐकताना एक वेगळाच भाव तयार झालाय.

ट्विटरवर शेअर

ट्विटरवर डॉ. प्रकाश भामरे यांनी ही व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे. त्याला त्यांनी ‘हे अप्रतिम आहे!’ अशी कॅप्शन दिली आहे. सोबतच या मंडळाची थोडक्यात अशी माहिती दिली आहे. यूझर्सना हा व्हिडिओ आवडला असून ते लाइक, कमेंट्स आणि रिट्विट करत आहेत. काही तासांतच 2200हून अधिक व्ह्यूज या व्हिडिओला मिळाले असून यात वाढ होत आहे.

आणखी वाचा :

Viral video : 3Dवरून थेट 8D! सेटअप असा काही बिघडला, की मुलगी थेट जमिनीवर…

चिमुकल्यानं आईला ओळखलंच..; आतापर्यंतचा Cute video अजिबात miss करू नका

Viral : काय जबरदस्त साधलंय संतुलन! पुन्हा पुन्हा पाहावा असा Stunt video

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.