AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अन्यथा चालकाला आवाज येईल; शहरात धावते ‘स्मूच कॅब’? फोटो समोर येताच सत्य कळाले

भारतातील एका शहरात 'स्मूच कॅब' सर्विस सुरु झाल्याची चर्चा सध्या सुरु आहे. आता खरच ही सुविधा सुरु आहे की या केवळ अफवा आहेत चला जाणून घेऊया...

अन्यथा चालकाला आवाज येईल; शहरात धावते 'स्मूच कॅब'? फोटो समोर येताच सत्य कळाले
Smooch CabImage Credit source: Social Media
| Updated on: Apr 04, 2025 | 6:13 PM
Share

नुकतीच एक घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये ‘स्मूच कॅब’ धावू लागल्याची बातमी समोर आली आहे. विशेषत: कपलसाठी ही खासगी कॅब सेवा असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना प्रवासादरम्यान खासगी वेळ घालवण्याची संधी मिळणार असल्याचे बोलले जात आहे. कारण संपूर्ण जगाला बंगळुरूची वाहतूक स्थिती माहित आहे. बहुतेक लोकांना स्मूच कॅब ही सर्विस योग्य वाटू लागली होती. या कॅबशी संबंधित काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. फोटोमध्ये कॅब ड्रायव्हर बॅक व्ह्यू मिररवर टेप लावताना दाखवण्यात आले आहे जेणेकरुन त्याला त्याच्या मागे चालणारे क्षण दिसू नयेत.

मात्र, हे सर्व खोटे असल्याचे समोर आले आहे. एका एक्स सोशल मीडिया यूजरने दावा केला होता की त्याने ही ‘स्मूच कॅब’ पाहिली. या यूजरने ‘आम्ही स्मूच कॅब पाहिली??? आत काय पाहिले हे आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही. पण मी प्रायव्हसीसाठी १० पैकी १० गुण देईन’ या आशयाची पोस्ट केली. यावर, मीम-आधारित डेटिंग ॲप Schmoozeने रिप्लाय देत ‘आताच बुक करा! केवळ १ एप्रिलपर्यंत ही सेवा उपलब्ध आहे’ असे म्हटले. वरवर पाहता हा एप्रिल फूलचा विनोद होता.

वाचा: पतीचा खोडसाळपणा नडला! पत्नीचे रात्रीचे ते क्षण झाले रेकॉर्ड… ऐकून पोलिसांनाही फुटला घाम

पोस्टमध्ये मोठे दावे करण्यात आले

सोशल मीडिया पोस्टमध्ये स्मूच कॅबच्या नियम आणि अटी शेअर करताना ही कॅब सेवा गोपनीयतेकडे लक्ष देते, असे म्हटले होते. चालकांना प्रवास करणाऱ्या ग्राहकाची तक्रार करण्याची परवानगी नाही. वाहनात रेकॉर्डिंग नसल्याचेही सांगण्यात आले. वाहनचालकांनी स्वत:च्या व्यवसायात लक्ष घालावे, असेही सांगण्यात आले. प्रवाशांना आवाजाची पातळी ७० डेसिबलच्या खाली ठेवण्याचा सल्ला देण्यात आला, अन्यथा चालकाला आवाज येईल. एखाद्या प्रवाशाच्या कुटुंबीयांनी त्याला कॅबमध्ये तर त्याला नाटक करावे लागेल.

लोकांना एप्रिल फूल बनवले गेले

रिपोर्ट्सनुसार, हे सर्व एप्रिल फूल डेचा आनंद घेण्यासाठी करण्यात आले होते. भारतात कुठेही स्मूच कॅब उपलब्ध नाहीत. पोस्टवर भरपूर कमेंट्स आल्यानंतर, पोस्ट करणाऱ्या अनुष्काने (@Kulfei) देखील ती बनावट असल्याची माहिती दिली. कारण ती पोस्ट फक्त १ एप्रिलसाठी होती. तो एप्रिल फूल जोक होता.

SchmoozeX म्हणजे काय?

SchmoozeX जगातील पहिले मीम्सवर आधारित डेटिंग ॲप असल्याचे म्हटले जाते. हे अॅप 25 लाखांहून अधिक लोकांनी डाउनलोड केले आहे. असा दावा केला जातो की या ॲपने 15 लाखांहून अधिक कपलची डेट अरेंज केली आहे.

Follow Us
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत