AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ट्रक चालकाची महिन्याची कमाई 5 ते 10 लाख रुपये; ट्रिक्स वाचून तुम्हीही…

ट्रक चालवून कुणालाही महिन्याला 5 ते 10 लाखाची कमाई होणार नाही. कारण या धंद्यात तेवढा पैसा मिळतच नाही. पण देशात एक ट्रक चालक असाही आहे, जो फक्त एक ट्रक चालवून महिन्याला 5 ते 10 लाखाची कमाई करतो. अस्सल देशी जुगाड करून त्याने हा मिळकतीचा मार्ग निर्माण केला आहे. त्याची कहाणी वाचून तुम्हीही...

ट्रक चालकाची महिन्याची कमाई 5 ते 10 लाख रुपये; ट्रिक्स वाचून तुम्हीही...
Truck Driver Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 19, 2024 | 8:46 PM
Share

एखादा ट्रक ड्रायव्हर महिन्याला 5 ते 10 लाख रुपये कमावतो असं सांगितल्यावर तुमचा विश्वास बसेल का? तुमचा विश्वास कधीच बसणार नाही. कारण ट्रक ड्रायव्हरला एवढी मिळकत नसतेच. पण झारखंडचा एक ट्रक ड्रायव्हर महिन्याला तब्बल 5 ते 10 लाख रुपये कमावत आहे. मेहनत आणि ध्यास या दोन गोष्टींमुळे त्याला हे शक्य झालं आहे. आता तुम्ही म्हणाल या ड्रायव्हरचा असा ध्यास आहे तरी कोणता? तर तो ध्यास म्हणजे नवं काही करण्याचा. त्याने अशीच एक नवीन गोष्ट केली अन् त्याच्या आयुष्यात पैशाच्या पावसाला सुरुवात झाली. काय आहे ही गोष्ट?

राजेश रावानी असं या ट्रक चालकाचं नाव आहे. तो मूळचा झारखंडचा आहे. गेल्या 20 वर्षापासून तो ट्रक चालवतो. त्याचं एक युट्यूब चॅनेल आहे. ‘R Rajesh Vlogs’ असं या युट्यूब चॅनलचं नाव आहे. त्याच्या माध्यमातून तो बक्कळ पैसा कमवत आहे. ट्रक चालक असल्यामुळे त्याला सतत फिरतीवर राहावं लागतं. त्यामुळे त्याला स्वत:च जेवण बनवावं लागतं. त्यामुळे त्याला जेवण तयार करण्याची सवयही झाली आहे. आता तो त्याचा छंद झाला आहे आणि याच छंदामुळे त्याला मोठा आर्थिक लाभ झाला आहे.

हा छंद जीवाला लावी पिसे…

या छंदामुळेच तो स्वयंपाक करतानाचे व्हिडीओ तयार करतो आणि त्याच्या युट्यूबला अपलोड करतो. त्याच्या चॅनलचे 1.87 मिलियन सब्सक्राईबर्स आहेत. राजेश रावानी हे गेल्या 25 वर्षांपासून रस्त्यावर ट्रक चालवत आहेत. आज ते युट्यूब स्टार बनले आहेत. युट्यूबच्या माध्यमातून ते लाखो रुपये कमावत आहेत. त्यांनी खाद्यपदार्थ आणि फिरणं याचा ब्लॉग बनवायला सुरुवात केली. आता त्यांचे लाखो फॉलोवर्स आहेत.

कुटुंबाचा भार म्हणून…

त्यांनी एका युट्यूबवरील मुलाखतीत आपल्या यशाचं रहस्य उघड केलं आहे. मी झारखंडचं एक छोटसं गाव जामताडा येथील रहिवाशी आहे. पण आमचं कुटुंब नंतर रामगढ येथे राहायला आलं. आमची आर्थिक परिस्थिती नाजूक होती. त्यामुळे मी कुटुंबाचा भार उचलण्यासाठी ट्रक चालवू लागलो. माझे वडीलही ट्रक चालवायचे. मग मीही ट्रक चालक झालो, असं राजेश सांगतात.

मुलाने पाया रचला अन्…

दूरचा प्रवास असेल तर राजेश स्वत: जेवण बनवायचे. याच सवयीने त्यांना आज यशस्वी केलं आहे. त्यांच्या मुलाने युट्यूबची सुरुवात केली होती. मुलाने जेवण बनवण्याचे व्हिडीओ युट्यूबला टाकले. लोकांना हे व्हिडीओ प्रचंड आवडले. स्वयंपाक बनवणाऱ्याचा चेहरा दाखवण्याची मागणी होऊ लागली. त्यानंतर त्यांच्या मुलाने एक व्हिडीओ तयार केला. त्यात राजेशचा चेहरा दिसत होता. या व्हिडीओला 4.5 लाख व्हूज मिळाले. मी युट्यूबच्या माध्यमातूनच 4 ते 5 लाख रुपये कमावतो. कधी कधी व्ह्यूजच्या आधारे ही कमाई होत असते. आपल्या या यशात कुटुंबाचा मोठा वाटा आहे. माझं कुटुंब कोणत्याही प्रसंगात माझ्यासोबत नेहमी राहतं, असं तो म्हणतो.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.