Video | भाजप आमदाराच्या मुलाची हव्वा… वाढदिवशी चक्क आयफोनने कापला केक, सोशल मीडियावर टीकेची झोड

व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा कर्नाटक राज्यातील भाजप आमदाराच्या मुलाचा आहे. या आमदाराचं नाव बसवराज दादेसुगूर असून त्याच्या मुलाचे नाव सुरेश असे आहे. सुरेशच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या मित्रांनी जवळपास दहा ते पंधरा केक आणल्याचं दिसत आहे.

Video | भाजप आमदाराच्या मुलाची हव्वा... वाढदिवशी चक्क आयफोनने कापला केक, सोशल मीडियावर टीकेची झोड
bjp mla boy birthday


मुंबई : वाढदिवस स्मरणात राहावा म्हणून लोक आकर्षक सजावट तसेच वेगवेगळ्या गोष्टी करतात. काही लोक एकापेक्षा एक आणि महागडे असे केक कापतात. केक कापण्यासाठी सामान्यत: आपण चाकू वापरतो. मात्र, सध्या कर्नाटकमधील भाजप आमदाराच्या मुलाचा एक वेगळाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. आमदाराच्या या मुलाने केक कापण्यासाठी चाकू नव्हे तर थेट आयफोनचा वापर केला आहे. आयफोन घेऊन त्याने केक कापला आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. (karnataka bjp mla boy cut his birthday cake with iphone people criticizing)

नेमका प्रकार काय आहे ?

व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा कर्नाटक राज्यातील भाजप आमदाराच्या मुलाचा आहे. या आमदाराचं नाव बसवराज दादेसुगूर असून त्याच्या मुलाचे नाव सुरेश असे आहे. सुरेशच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या मित्रांनी जवळपास दहा ते पंधरा केक आणल्याचं दिसत आहे. हे सर्व केक कापण्यासाठी सुरेशने चक्क आयफोनचा वापर केला आहे. सुरेश प्रत्येक केकला आयफोनच्या मदतीने कापत आहे.

हे तर श्रीमंतीचे प्रदर्शन, नेटकऱ्यांची टीका

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अनेकांनी आयफोनने केक कापणे ही सामान्य बाब असल्याचे म्हटले आहे. तर कही लोकांनी याला श्रीमंतीचे प्रदर्शन करणे म्हणत टीका केलीय. सोशल मीडियाच्या विविध माध्यमांवर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय.

पाहा व्हिडीओ :

कोरोनामुळे चाकू ऐवजी आयफोन वापरला   

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर राजकीय प्रतिक्रियादेखील उमटल्या आहेत. काँग्रेसने या प्रकारामुळे भाजप आमदारावर टीका केली. हा गरीब आणि वंचितांचा अपमान असल्याचं भाजपनं म्हटलंय. तर काँग्रेसच्या या टीकेनंतर आमदार बसवराज यांनी आपल्या मुलाची पाठराखण केली. माझ्या मुलाने त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याने स्वत: कमवलेले पैसे खर्च केले आहेत. सध्या कोरोना महामारी आहे. त्यामळे चाकूऐवजी त्याने आयफोनचा उपयोग केला असावा असे, असे अजब तर्कट भाजप आमदार बसवराज यांनी मांडले आहे.

इतर बातम्या :

VIRAL : आमच्याशी वाकडं तर नदीवर लाकडं, सतत त्रास देणाऱ्या गव्याला हत्तीने सोंडेने उचलून आपटलं

Video | पोहण्यासाठी महिला स्विमिंग पुलावर उभी राहिली, पाण्यात उडी मारताच उडाली फजिती, पाहा मजेदार व्हिडीओ

Video | तरुणाची हँडलकडे पाठ, तरीही चावलतोय शिताफीने बाईक, चक्रावून सोडणारा व्हिडीओ व्हायरल

(karnataka bjp mla boy cut his birthday cake with iphone people criticizing)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI