Video | शासनाने गरब्यावर बंदी घातली, मग काय कोकणी माणसाने नवा पर्याय शोधला, मजेदार व्हिडीओ पाहाच !

शासनाने गरबा, दांडिया आदीवरदेखील बंदी घातली आहे. या बंदीवर सोशल मीडियावर वेगवेगळे मीम्स आणि मजेदार व्हिडीओ शेअर केले जात आहेत. सध्या तर एक अतिशय मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका कोकणी माणसांनी गरबा खेळण्यासाठी एक नामी युक्ती वापरली आहे.

Video | शासनाने गरब्यावर बंदी घातली, मग काय कोकणी माणसाने नवा पर्याय शोधला, मजेदार व्हिडीओ पाहाच !
VIRAL VIDEO

मुंबई : सध्याची कोरोनास्थिती पाहता राज्य सरकारने सण आणि उत्सवांवर निर्बंध घातले आहेत. सार्वजनिक कार्यक्रम तसेच उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन राज्य सरकार करत आहे. सध्या नवरात्रोत्सव सुरु झाला आहे. मात्र शासनाने गरबा, दांडिया आदीवरदेखील बंदी घातली आहे. या सर्व निर्बंधांमुळे काही लोक नाराजी व्यक्त करत आहेत. या बंदीवर सोशल मीडियावर वेगवेगळे मीम्स आणि मजेदार व्हिडीओ शेअर केले जात आहेत. सध्या तर एक अतिशय मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कोकणी माणसांनी गरबा खेळण्यासाठी एक नामी युक्ती वापरली आहे.

गोलाकार उभे राहून भात झोडणी

व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळालेली नाही. मात्र, तो कोकणातील असल्याचा दावा केला जातोय. या व्हिडीओमध्ये काही महिला तसेच पुरुष गोलाकार उभे आहेत. त्यांच्यासमोर एक टेबल आहे. टेबलावर ते भात झोडणी करत आहेत. भात झोडणी करताना ते गरबा खेळत आहेत. विशेष म्हणजे भात झोडणी करणारे हे सर्व लोक मजेत गरबा खेळत आहेत. तसेच ते टेबलाभोवती लयीत गरबा खेळत आहेत.

सरकारने गरब्यावर बंदी घातली, मग वापरला हा फंडा

गरब खेळत असलेले महिला आणि पुरुष अतिशय आनंदात आहेत. हाच व्हिडीओ नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर अपलोड केला आहे. यावेळी हा व्हिडीओ शेअर करताना नेटकऱ्यांनी मजेदार कॅप्शन दिले आहेत. सरकारने गरब्यावर बंदी घातली आहे. मग काय कोकणी माणसाने हा नवा फंडा वापरला, असं कॅप्शन एका नेटकऱ्यांने दिलं आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल 

सध्या या व्हिडीओची सोशल मीडियावर एकच चर्चा होत आहे. हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून नेटकरी त्याला उत्स्फूर्तपणे शेअर करत आहेत.

इतर बातम्या :

Video: एलपीजीचा दर वाढवल्याने महिलांकडून सिलिंडरभोवती गरबा खेळून निषेध, महागाई विरोधात महिलांना अनोखं आंदोलन

Video: एक टमटम, 4 पोलीस आणि पाणी साचलेला रस्ता, यूपी पोलिसांच्या नावाने व्हिडीओ व्हायरल

Video: नवरीच्या भावाने नवरा-नवरीला सोबत उचललं, आणि जमिनीवर फेकलं, अनोख्या प्रथेचा व्हिडीओ व्हायरल

(konkani people playing garba in unique video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI