AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्याने वाचली गर्लफ्रेंडची पर्सनल डायरी, मग मात्र त्याच्या पायाखालची जमीनच सरकली !

रेडिटवर एका व्यक्तीने आपली मनस्थिती व्यक्त केली आहे. तो म्हणतो की, एके दिवशी त्याने गुपचूप आपल्या मैत्रिणीची वैयक्तिक डायरी वाचली, पण त्यात लिहिलेल्या गोष्टी वाचून त्याला धक्काच बसला. त्याची मैत्रीण असा विचार करू शकते यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता.

त्याने वाचली गर्लफ्रेंडची पर्सनल डायरी, मग मात्र त्याच्या पायाखालची जमीनच सरकली !
Image Credit source: Pixabay
| Updated on: May 15, 2023 | 2:51 PM
Share

लोक एकमेकांना समजून घेईपर्यंत कोणतेही नाते सुरळीत चालत नाही. विशेषतः गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड आणि नवरा-बायकोच्या नात्यात विश्वासाची सर्वात जास्त गरज असते, नाहीतर हे नातं तुटायला वेळ लागत नाही. विश्वास आणि प्रेम या एकमेव गोष्टी या नात्याला आयुष्यभर एकत्र ठेवू शकतात. तुम्ही पाहिलं असेल की अनेकांना सवय असते की ते त्यांच्या आयुष्याशी निगडीत गोष्टी डायरीत नोंदवतात आणि आपल्या पार्टनरला ती डायरी वाचूही देत ​​नाहीत. अशा वेळी त्या डायरीत काय लिहिले आहे हे जाणून घेण्याची इच्छा त्या जोडीदाराच्या मनातही निर्माण होते. असाच एक मुद्दा सध्या चर्चेत आहे, ज्याने लोकांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.

वास्तविक, एका प्रियकराने प्रेयसीची वैयक्तिक डायरी गुपचूप वाचली आणि ती वाचून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या डायरीत असे काही लिहिले होते की त्याचे भान हरपले. हे प्रकरण कोठून आहे हे माहित नाही, परंतु एका व्यक्तीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Reddit वर संपूर्ण कथा सांगितली आहे. त्या व्यक्तीने सांगितले की त्याची एक गर्लफ्रेंड आहे, जिच्यासोबत तो गेल्या एक वर्षापासून लॉन्ग डिस्टंन्स रिलेशनशिप आहे. त्यांची भेट एक-दोन आठवड्यातच होते.

द मिररच्या वृत्तानुसार, नुकताच तो माणूस आपल्या मैत्रिणीला भेटायला गेला होता आणि तिच्या घरी थांबला होता. यादरम्यान त्याने प्रेयसीला काही कामासाठी एक वही मागितली, तेव्हा तिने सांगितले की ती बेडरूममध्ये रॅकवर ठेवली आहे, जा आणि घेऊन ये. जेव्हा तो व्यक्ती तिथे पोहोचला तेव्हा त्याने पाहिले की काळ्या रंगाची एक डायरीही होती. मग काय, त्याने लगेच डायरी उघडली आणि वाचायला सुरुवात केली. डायरी वाचल्यावर कळले की त्याच्या मैत्रिणीला त्याच्याबद्दल चुकीच्या भावना आहेत आणि खूप राग आहे. त्या डायरीत लिहील्यनुसार, गर्लफ्रेंडला असे वाटते की तिचा मित्र तो खूप संशयास्पद आहे. तिचा प्रियकर आपली फसवणूक करत असल्याचे तिला वाटते आणि तो दुसऱ्या मुलीसोबत डेटवर जातो.

त्या व्यक्तीने सांगितले की त्याची गर्लफ्रेंड त्याचे सोशल मीडिया अकाउंट देखील ट्रॅक करते आणि तो कुठे जात आहे आणि कुठे नाही हे जाणून घेण्याचा प्रयत्न करते. त्या व्यक्तीने Reddit वर लोकांना विचारले आहे की हा त्याच्यासाठी इशारा आहे का? यावर लोकांनी आपली मतेही मांडली आहेत. काही लोक मुलीपासून ताबडतोब सुटका करून घेण्यास सांगत आहेत, तर काही जण म्हणत आहेत की याबाबत तुमच्या मैत्रिणीशी बोला आणि तिची शंका दूर करण्याचा प्रयत्न करा.

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.