Viral Video in Gym : जिममध्ये करत होता चुकीच्या पद्धतीनं व्यायाम, नंतर घडतं असं काही…

लोक स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी जिम(Gym)मध्ये जातात. पण काही तरुण मुलींवर इम्प्रेशन पाडण्यासाठी जिममध्ये जातात. पण या स्टाइलच्या नादात स्वत:चाच अपमान करून घेतात. एक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) झालाय, ज्यात असंच काहीसं झाल्याचं पाहायला मिळतं.

Viral Video in Gym : जिममध्ये करत होता चुकीच्या पद्धतीनं व्यायाम, नंतर घडतं असं काही...
चुकीच्या पद्धतीनं जिममध्ये व्यायाम करताना तरूण

लोक स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी जिम(Gym)मध्ये जातात आणि घाम गाळून व्यायाम करतात. काही लोक योग्य प्रकारे व्यायाम करतात, नियम पाळतात, तर काही लोक फक्त दिखावा करण्यासाठी येतात. आजकालचे काही तरुण मुलींवर इम्प्रेशन पाडण्यासाठी, स्टाइल मारण्यासाठी जिममध्ये जातात. पण या स्टाइलच्या नादात स्वत:चाच अपमान करून घेतात. एक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) झालाय, ज्यात असंच काहीसं झाल्याचं पाहायला मिळतं.

आयुष्यभर ठेवेन लक्षात

व्हिडिओमध्ये एक व्यक्ती विचित्र पद्धतीनं व्यायाम करत आहे. क्लिप पाहून तो शेजारी उभ्या असलेल्या मुलीला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतं. तो चुकीच्या पद्धतीनं पुल-अप्स करत आहे, परंतु त्याची व्यायाम करण्याची पद्धत अत्यंत चुकीची आपल्याला स्पष्ट दिसतं. शेवटी त्याला त्याचा फटका सहन करावा लागतोच. किमान यानंतर तरी तो आता आयुष्यभर हे लक्षात ठेवेन.

…आणि थेट तोंडावर पडतो

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, की एक पुरुष जिममध्ये फास्ट पुल-अप्स करत आहे आणि यादरम्यान तो डावीकडे उभ्या असलेल्या महिला ट्रेनरकडे पाहत आहे. तो वेगाने पुल-अप्स मारतो, पण थोड्या वेळानं त्याचा हात निसटतो आणि तो थेट तोंडावर पडतो. त्याला पडताना महिलेनं पाहताच ती लगेच त्याच्याकडे गेली आणि त्याची प्रकृती जाणून घेतली. मात्र, त्या व्यक्तीला गंभीर दुखापत झाली होती.

View this post on Instagram

A post shared by Meme wala (@memewalanews)

‘तरुणांनी अशा प्रकारे आपला जीव धोक्यात घालू नये’

हा व्हिडीओ कधीचा आणि कुठला आहे, याबाबत कोणतीही माहिती नाही. यूझर्स या व्हिडिओवर सातत्यानं कमेंट करून आपलं मत व्यक्त करत आहेत. तरुणांनी अशा प्रकारे आपला जीव धोक्यात घालू नये, असं सर्वांचंच म्हणणं आहे. असे धोकादायक स्टंट आणि ते करणार्‍यांपासून नेहमी ठराविक अंतर ठेवावं. व्हिडिओ पाहिल्यानंतर, एका यूझरनं सांगितलंय, की स्टंट करण्याच्या नादात लोक खरोखर त्यांच्या जीवाची पर्वा करत नाहीत. त्याचवेळी दुसऱ्या यूझरनं हा जीवघेणा स्टंट असल्याचं सांगितले.

Viral : थंडीपासून वाचण्यासाठी अवलियानं केलाय अजब जुगाड, VIDEO पाहून हसतच राहाल

आनंद महिंद्रा यांनी अलिबागमधल्या सूर्यास्ताचा सुंदर फोटो केला ट्विट, नेटिझन्सनीही Share केले अप्रतिम Photos

महिला न्यायाधीशानं घेतलेलं कैद्याचं चुंबन कॅमेऱ्यात कैद, Video सोशल मीडियावर Viral

Published On - 12:21 pm, Thu, 13 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI