Video | डोसा खाण्यासाठी लोकांची झुुंबड, तयार होण्याआधीच तुटून पडले, नेटकरी अवाक्

या व्हिडीओमध्ये डोसा खाण्यासाठी पाहुण्यांनी चांगलीच गर्दी केली आहे. ही गर्दी एवढी मोठी आहे की डोसा तयार करणारा माणूससुद्धा हतबल झाला आहे. डोशापाई एकमेकांवर पडणाऱ्या लोकांना पाहून नेटकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत.

Video | डोसा खाण्यासाठी लोकांची झुुंबड, तयार होण्याआधीच तुटून पडले, नेटकरी अवाक्
VIRAL VIDEO

मुंबई : सोशल मीडियावर कधी काय समोर येईल हे सांगता येत नाही. सध्या तर एक अतिशय विचित्र आणि हसायला लावणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये डोसा खाण्यासाठी पाहुण्यांनी चांगलीच गर्दी केली आहे. ही गर्दी एवढी मोठी आहे की डोसा तयार करणारा माणूससुद्धा हतबल झाला आहे. डोशापाई एकमेकांवर पडणाऱ्या लोकांना पाहून नेटकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत. (people trying to eat dosa before it is prepared funny video went viral on social media)

डोसा खाण्यासाठी पाहुण्यांची गर्दी

कोणताही समारंभ म्हटलं की त्यामध्ये लोकांची गर्दी तसेच जेवणाची मेजवानी ही आलीच. अशा समारंभात लोकांच्या जेवणाची आबाळ होऊ नये म्हणून स्पेशल स्वयंपाकी लावले जातात. मात्र, कधीकधी गोष्टी एवढ्या हाताच्या बाहेर जातात की जेवणासाठी पाहुण्यांची गर्दी पाहून सगळेच डोक्याला हात लावून बसतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये असंच काहीसं घडलं आहे. या व्हिडीओमध्ये डोसा खाण्यासाठी पाहुण्यांनी चांगलीच गर्दी केली आहे. बरं या लोकांनी फक्त गर्दीच केलेली नाही, तर ते डोसा तयार होण्याआधीच त्यावर तुटून पडले आहेत.

झुंबड, गर्दी पाहून डोसा तयार करणारा माणूस हताश

व्हिडीओमध्ये डोसा खाण्यासाठी लोकांनी गर्दी केल्याचे दिसत आहे. समोरची गर्दी पाहून डोसा तयार करणाऱ्या माणसाने एक मोठा डोसा तयार केला आहे. डोसा तयार झाल्यामुळे माणूस तो रोल करुन त्याचे तुकडे करण्याचा प्रयत्न करतोय. मात्र, त्याआधीच गर्दी केलेले लोक डोशावर तुटून पडले आहेत. लोकांनी डोशाचे तुकडे स्वत:च केले आहेत. तसेच डोसा मिळाला म्हणून व्हिडीओतील पाहुण्यांच्या तोंडावर हास्य झळकले आहे. तर लोकांची झुंबड आणि गर्दी पाहून डोसा तयार करणारा माणूस हताश झाला आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आलाय. काही लोक हा व्हिडीओ पाहून आश्चर्य व्यक्त करत आहेत. तर काही लोक या व्हिडीओला पाहून पोट धरून हसत आहेत. व्हायरल होत असलेला हा प्रसंग नेमका कुठला आहे, यबाबाबत माहिती मिळू शकलेली नाही, मात्र त्याला tube.indian या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आले आहे.

इतर बातम्या :

Video | भर चौकात जोडीची करामत, तरुण-तरुणीचा मजेदार डान्स व्हायरल

Video | कुत्र्यांवर महिलेचं भलतंच प्रेम, पण खेळताना मध्येच घोळ झाला, पाहा नेमकं काय घडलं ?

Video | रेल्वे रुळावर माणूस बेशुद्ध होऊन पडला, पण जिगरबाज पोलिसाने करुन दाखवलं, रेस्क्यू ऑपरेशनचा थरार

(people trying to eat dosa before it is prepared funny video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI