Amazing Jugaad : तुम्ही सोशल मीडियावर (Social media) चोरीचे (Steal) अनेक व्हिडिओ (Video) पाहिले असतील. यातील काही व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. काही चोर खूपत हुशार असतात, पण त्यांचीही चोरी पकडली जाते किंवा कॅमेरात कैद होते. आपल्याला मात्र हे पाहून धक्का बसतो. काही चोर चोरी करण्यासाठी अतिशय विचित्र पद्धती वापरतात. सध्या अशाच एका विचित्र चोरीचा जुगाड व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये चोर इतक्या हुशारीने ऊसावर हात साफ करतो, जो पाहून तुम्हाला मजा येईल. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणू शकाल, की या चोरीची माहितीही कुणाला मिळणार नाही. या व्हिडिओमध्ये चोर खूप डोके वापरतो. ऊस चोरीचा स्मार्टनेस पाहून सोशल मीडिया यूझर्सही हैराण झाले आहेत.
हा व्हिडिओ naturelovers_ok नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अपलोड करण्यात आला आहे. पैसे, दागिने चोरीला गेल्याचे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. पण शेतातून ऊस चोरीला गेल्याची घटना क्वचितच ऐकली असेल. चोर कसा ऊसाच्या शेतात घुसला हे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्याच्यासमोर ऊसाचे मोठे झाड आहे. यानंतर तो ऊसाचे तीन भाग करतो. यानंतर, मधला भाग घेऊन, खिळ्याच्या साहाय्याने उर्वरित वरचे आणि खालचे भाग जोडतो. व्हिडिओ पाहा –
View this post on Instagram
हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून सोशल मीडिया यूझर्स आश्चर्यचकित झाले आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक आश्चर्यचकित इमोजीच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. ऊस चोरण्यात माणसाने जेवढा बुद्धी वाहून घेतला आहे तेवढा मेंदू शास्त्रज्ञांनाही नाही, असे काही लोक म्हणत आहेत. व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. यासोबतच या व्हिडिओला हजारो लोकांनी लाइकही केले आहे.