‘आमीरनंतर आता तुझं लग्नही तुटणार’ म्हणणाऱ्या ट्रोलरला रिचा चड्ढाचा भोली पंजाबन स्टाईल झटका!

ट्रोलर्सचे तोंड कसं बंद करावे हे रिचाला चांगलेच माहीत आहे. असेच एक प्रकरण समोर आले आहे. जिथे रिचाने भोली पंजाबान स्टाईलमध्ये एका ट्विटर युजरच्या प्रश्नाला कडक उत्तर दिलं.

'आमीरनंतर आता तुझं लग्नही तुटणार' म्हणणाऱ्या ट्रोलरला रिचा चड्ढाचा भोली पंजाबन स्टाईल झटका!
रिचाने भोली पंजाबान स्टाईलमध्ये एका ट्विटर युजरच्या प्रश्नाला कडक उत्तर दिलं.

भोली पंजाबान या व्यक्तिरेखेने चाहत्यांच्या हृदयात स्थान निर्माण करणारी रिचा चड्ढा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती प्रत्येक गोष्ट तिच्या चाहत्यांसोबत शेअर करते. मग ते वैयक्तिक असो कि व्यावसायिक. हेच कारण आहे की अनेक वेळा तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. पण अशा ट्रोलर्सचे तोंड कसं बंद करावे हे रिचाला चांगलेच माहीत आहे. असेच एक प्रकरण समोर आले आहे. जिथे रिचाने भोली पंजाबान स्टाईलमध्ये एका ट्विटर युजरच्या प्रश्नाला कडक उत्तर दिलं. (Richa Chadha give epic reply to user who said her marriage won’t last long just like Aamir Khan)

त्याचं झालं असं की रिचाने ट्विटरवर अलीसोबतचा एक फोटो पोस्ट केला. या चित्रावर इमोजी बनवून तिने आपले प्रेम व्यक्त केले. रिचाच्या या पोस्टला तीन हजारांहून अधिक लाइक्स आणि 63 रीट्वीट मिळाले आहेत. यासह, अनेकांनी या फोटोवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यापैकी एकाने आक्षेपार्ह टिप्पणी केली, ज्याला रिचाने योग्य उत्तर दिले.

रिचाची आधीची पोस्ट आणि त्यावर ट्रोलरचं वादग्रस्त वक्तव्य:

रिचाच्या फोटोवर टिप्पणी करताना युजरने लिहिले, ‘तुझा घटस्फोट कधी होत आहे हे मला सांग, कारण तुझं लग्न आमिर खानसारखंच फार काळ टिकणार नाही.’

रिचाने या युजरचा उत्तर देत चांगलंच झापलं, रिचा काय म्हणाली तुम्हीच पाहा:

नेटकऱ्यांच्या रिचाच्या उत्तरावर प्रतिक्रिया

 

 

रिचाचे हे योग्य उत्तर सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. अनेक युजर्सनी रिचाला कमेंट करताना समर्थन दिलं आहे, तर अनेक लोकांनी या युजरची चेष्टा करताना वेगवेगळ्या गोष्टी लिहिल्या. एका युजरने लिहिले आहे की, ‘रिचा मॅडमने भोली पंजाबी स्टाईलने या भाऊची चांगलीच शाळा घेतली’

हेही पाहा:

Video: ना कुठला मेकअप, ना भारी ड्रेस, एका स्मितहास्याने तिने नेटकऱ्यांची मनं जिंकली, पाहा पाकिस्तानी मुलीचा व्हिडीओ

Video: यूपीत वाहतूक पोलिसांची दबंगगिरी, तरुणाला जखमी करणाऱ्या पोलिसाला नागरिकांकडून चोप, व्हिडीओ व्हायरल

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI