Video | जाब विचारताच हवालदार भडकला, वरिष्ठ अधिकाऱ्याच्या थेट कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 25, 2021 | 11:37 PM

पश्चिम रेल्वेच्या अहमदाबाद विभागातील ध्रंगधरा रेल्वे स्थानकावर एका आरपीएफ कॉन्स्टेबलने वरिष्ठ निरीक्षकावर हात ऊचलल्याची धक्कादायक घटना घाडली आहे. कॉन्स्टेबलने अधिकाऱ्याच्या थेट कानशिलात लगावली आहे. तसेच या कॉन्स्टेबलने मारण्याची धमकीसुद्धा दिलीय.

Video | जाब विचारताच हवालदार भडकला, वरिष्ठ अधिकाऱ्याच्या थेट कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल
POLICE CONSTABLE
Follow us

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या अहमदाबाद विभागातील ध्रंगधरा रेल्वे स्थानकावर एका आरपीएफ कॉन्स्टेबलने वरिष्ठ निरीक्षकावर हात ऊचलल्याची धक्कादायक घटना घाडली आहे. कॉन्स्टेबलने अधिकाऱ्याच्या थेट कानशिलात लगावली आहे. तसेच या कॉन्स्टेबलने मारण्याची धमकीसुद्धा दिलीय. कॉन्स्टेबलने कानशिलात लावल्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. (rpf police constable beat police inspector video went viral on social media)

अगोदर पोलीस अधिकाऱ्याने हवालदारांना मारलं 

मिळालेल्या माहितीनुसार पश्चिम रेल्वेच्या अहमदाबाद विभागात ध्रंगधरा रेल्वे स्थानकावर आरपीएफ पोलीस उभे होते. यावेळी कर्तव्यावर असलेल्या दोन हवालदारांनी एका आरोपीवर योग्य कारवाई केली नाही. कारवाई न केल्यामुळे वरिष्ठ निरीक्षकाने त्यांना जाब विचारला. तसेच अधिकाऱ्याने या दोन्ही हवालदारांना मारहाण करुन त्यांना नोकरीवरुन काढून टाकण्याचीही धमकी दिली.

नंतर हवालदाराने कानशिलात लगावली

या सर्व प्रकारानंतर दोन्ही हवालदार चांगलेच चिडले. या दोघांनीही सूडभावनेतून अधिकाऱ्याला मारहाण करणे सुरु केले. यातील एका हवालदारने तर अधिकाऱ्याच्या थेट कानशिलात लगावली. तसेच बेल्टने मारण्याचीही धमकी दिली.

पाहा व्हिडीओ :

घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा सर्व प्रकार लोकांसमोरच घडला. यावेळी काही पत्रकादेखील उपस्थित होते. पत्रकारांसमोरच हा प्रकार घडल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. हवालदारांनी वरिष्ठ अधिकाऱ्याचा अशा प्रकारे समाचार घेतल्यामुळे सगळीकडे एकच चर्चा होत आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मारहाण करणारे हवालदार तसेच पोलीस अधिकार कोण आहेत, याची निश्चित माहिती मिळू शकलेली नाही.

इतर बातम्या :

सांगलीच्या भंगारातील खुर्ची थेट इंग्लंडच्या कॅफेत ! मंडपवाल्या बाळू लोखंडेची एकच चर्चा, गमतीदार प्रवास नेमका कसा झाला ?

Video | “अल्लाहसाठी स्त्री-पुरूष समान, मला शाळेत जायचंय” अफगाणिस्तानमधील मुलीचा व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर लोकप्रिय ठरतोय एक्सेंट चॅलेंज, मिस्टर आणि मिसेस नेनेंचा व्हिडीओ व्हायरल

(rpf police constable beat police inspector video went viral on social media)

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI