AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“व्वा मोदीजी व्वा ! गॅस महागल्यामुळे नवणीत राणांवर चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ” रुपाली चाकणकरांची खोचक टीका

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी राणा यांच्या याच व्हिडीओचा आधार घेत केंद्र सरकार आणि भाजप आणि नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला आहे.

व्वा मोदीजी व्वा ! गॅस महागल्यामुळे नवणीत राणांवर चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ रुपाली चाकणकरांची खोचक टीका
RUPALI CHAKANKAR NAVNEET RANA
| Edited By: | Updated on: Aug 04, 2021 | 12:02 AM
Share

मुंबई : सोशल मीडियावर कायम सक्रिय असणाऱ्या खासदार नवनीत राणा (Navnit Rana) यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये राणा चक्क चुलीवर स्वयंपाक करताना दिसत आहेत. राणांचा हा व्हिडीओ काही लोकांना चांगलाच आवडला आहे. मात्र, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी राणा यांच्या याच व्हिडीओचा आधार घेत केंद्र सरकार, भाजप आणि नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला आहे. गॅस महाग झाल्यामुळे नवनीत राणा यांना गॅस ऐवजी चुलीवर स्वयंपाक करावा लागत आहे, अशी खोचक टीका रुपाली चाकणकर यांनी केली. (Rupali Chakankar criticizes Navnit Rana said due to price hike of gas cylinder Navnit Rana cooking on fire)

रुपाली चाकणकर यांची खोचक टीका

रुपाली चाकणकर यांनी “गॅस महाग झाल्यामुळे नवनीत राणा यांना गॅस ऐवजी चुलीवर स्वयंपाक करावा लागत आहे. मोदीजी तुमच्या राज्यात खासदार पण महागाईमुळे गॅस ऐवजी चूल वापरायला लागले आहेत. व्वा! मोदीजी व्वा!, अशा शब्दात निशाणा साधला आहे.

उज्ज्वला गॅस योजना अपयशी, नवनीत राणा ट्रोल 

नवनीत राणा या सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. मदतारसंघातील पाहणी किंवा विविध कार्यक्रमांचे फोटो,व्हिडीओ त्या सोशल मीडियावर अफलोड करत असतात. त्यांच्या प्रत्येक फोटोची आणि व्हिडीओची चर्चा होते. मात्र, राणा यांच्या या व्हडीओवर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी नवनीत राणांचा हा व्हिडीओ म्हणजे गॅस दरवाढीचा निषेध असल्याची टीका केली. तर काहींनी केंद्र सरकारची उज्ज्वला गॅस योजना अपयशी ठरल्याची कमेंट करत नवनीत राणांना ट्रोल केलं.

दरम्यान, नवनीत राणा दर शनिवार-रविवारी आपल्या अंजनगावाला भेट देतात. तिथल्या शेतातल्या मुक्कामादरम्यान त्यांनी चुलीवर स्वयंपाक केला. 2 ऑगस्ट रोजी राणा यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर हा व्हिडीओ अपलोड केलेला आहे.

पाहा व्हिडीओ :

इतर बातम्या :

Pandharpur Corona : विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सुरु करा, येणाऱ्या भाविकांची कोरोना चाचणी करा, आमदार प्रशांत परिचारकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Bell Bottom Trailer Review | 4 हायजॅकर्स, 210 प्रवाशांना वाचवण्याचं आव्हान, बेल बॉटमचा थरारक ट्रेलर पाहिलात ?

Maharashtra HSC Result 2021 declared LIVE Updates : बारावीचा निकाल वेबसाईटवर जाहीर, निकालासाठी इथे क्लिक करा

(Rupali Chakankar criticizes Navnit Rana said due to price hike of gas cylinder Navnit Rana cooking on fire)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.